Child marriage free campaign | बालविवाहमुक्त अभियानात महाराष्ट्र देशात आघाडीवर : अदिती तटकरे

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रोखले 32 बालविवाह
Child marriage free campaign
महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : देश पातळीवर राबविण्यात येत असलेल्या बालविवाहमुक्त अभियानात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, असा दावा राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी केला आहे.

राज्यात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विवाहाचे प्रमाण अधिक असते. या दिवशी महिला व बालविकास विभागाने ‌‘स्पेशल फोर्स‌’च्या माध्यमातून तब्बल 32 बालविवाह रोखले. राज्य शासनाने बालविवाहमुक्त भारत या 100 दिवसांच्या अभियानांतर्गत जनजागृती, समन्वय आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविले. व्यवस्थापन, कुटुंबाचा सातत्याने पाठपुरावा, शिक्षण, कौशल्यविकास, समुपदेशन आणि पोषण सेवांशी समन्वय साधण्याचे काम या अभियानामार्फत राबविण्यात आले होते.

Child marriage free campaign
Rupali Chakankar Controversy: रुपाली चाकणकरांच्या अडचणीत भर; सुषमा अंधारे यांचा रायगडमधील व्यावसायिक संबंधांचा गंभीर आरोप

बालविवाह रोखण्याबरोबरच संबंधित बालिकांच्या पुनर्वसन, शिक्षण आणि संरक्षणासाठीही ठोस पावले उचलली जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पालक व मध्यस्थांवर कारवाई केली जात आहे, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.

Child marriage free campaign
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर 32 अपघातप्रवण क्षेत्रे

जिल्हानिहाय रोखलेले बालविवाह

रायगड 2, पालघर 1, सांगली 1, नाशिक 2, अहिल्यानगर 5, परभणी 1, लातूर 1, बीड 3, हिंगोली 1, धाराशिव 2, संभाजीनगर 4, बुलडाणा 1, अकोला 4, यवतमाळ 2, चंद्रपूर 2 असे एकूण 32 बालविवाह रोखण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news