Sting Energy Drink Ban: राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदी

Sting Energy Drink Ban
Sting Energy Drink Banpudhari
Published on
Updated on

Sting Energy Drink Ban: महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.

Sting Energy Drink Ban
RBI Bank Restrictions: RBIचा मोठा दणका! मुंबईतील 'या' बँकेवर 6 महिन्यांची बंदी; खातेदारांना फक्त 1 लाख रुपये काढता येणार

सरकारने हा निर्णय मुले आणि तरूण या ड्रिंक्सच्या आहारी जात असल्याने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून घेतला आहे. संबंधित आदेश हा याबाबतच्या विभागांना लवकरच पाठवण्यात येणार आहे. या नियमाचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी करडी नजर ठेवली जाईल.

Sting Energy Drink Ban
Gold Price Crash: सोनं कोसळणार? अमेरिकेच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ; तज्ज्ञांचा मोठा इशारा

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यावेळी आज आमदार विक्रम पाचपुते यांनी याबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी 'सभापती नार्वेकर यांना स्टिंगचे सॅम्पल दाखवून यात कॅफेन, टोरेन आणि शुरगचे प्रमाण हे जरी नियमात बसणारं असलं तरी या सर्वाचे कॉम्बिनेशन हे डेडली आहे. याचे मुलांना व्यसन लागते. उत्पादक स्वतः हे मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी योग्य नाहीये असं मान्य करतात. हे असं असलं तरी हे सरास शाळांच्या जवळ मिळते. याबाबत मंत्री महोदय कारवाईचे आदेश देणार का असा प्रश्न विचारला होता.'

Sting Energy Drink Ban
Mumbai Water Crisis: मुंबईतील विहिरींचेही पाणी आटले! एक टँकर भरायला लागतात ५ तास

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आम्ही प्राथमिक शिक्षक, पालकांना देखील याबाबत शाळांच्या आवारात मुलांना हे व्यसनाधीनतेकडे नेणारे पदार्थ न देण्याचे आवाहन केलं असून शाळांच्या ५०० मीटर परिसरात असे पदार्थ आढळून आले तर कारवाई करण्यात येईल असे निर्देश देण्यात आल्याचे देखील सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news