Devendra Fadnavis : ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड
Maharashtra App Based Transport Services
Devendra Fadnavispudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारा अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड देऊन वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्र ॲग्रीगेटर नियमावली-२०२६ संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲग्रीगेटर क्षेत्रातील वाढती वाहन संख्या, स्वतंत्र टॅक्सीचालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra App Based Transport Services
MPSC Paper Leak Case : एमपीएससी परीक्षा गैरव्यवहार; मुंबईत होणार सार्वजनिक सुनावणी

संपूर्ण माहिती एका प्लॅटफॉर्मवर

ॲग्रीगेटर कंपन्यांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी, त्यासाठी वापरले जाणारे पार्किंगचे ठिकाण, संबंधित चालकाची माहिती, वाहन चालविण्याचा परवाना, पोलिस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, दिवसभरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कोणता चालक कोणते वाहन चालवितो, याची अद्ययावत नोंद या प्रणालीत असावी. एखादी घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने उपलब्ध होईल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रवास वाटपातील पारदर्शकतेसाठी अल्गोरिदमचे परीक्षण

ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक व मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रवास वाटपामध्ये भेदभाव होत असल्यास तो ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

Maharashtra App Based Transport Services
Dry Fruits Price Hike : सुकामेवा महागला तरी दिवाळीत उलाढाल मोठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.