Digital Agriculture: महाराष्ट्रात लवकरच 'डिजिटल शेती'चा अवलंब; राज्य आणि जिल्हा स्तरावर ॲग्रीस्टॅक योजनेसाठी टास्क फोर्स गठित करणार

डिजिटल डेटाचा प्रभावी वापर करण्यासाठी शासनाचा निर्णय; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय टास्क फोर्स
Digital Agriculture
Digital AgriculturePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन अंतर्गत राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ॲग्रिस्टॅक या प्रकल्पांतर्गत डिजिटल डेटाचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्य आणि जिल्हा स्तरावर विशेष 'कृती दल' गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय टास्क फोर्स

राज्य स्तरावर 'राज्यस्तरीय कृती दल' ची स्थापना करण्यात आली असून, राज्याचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

या समितीत महसूल, जलसंपदा, सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास यांसारख्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव व सचिव यांच्यासह जमाबंदी आयुक्त, कृषी आयुक्त, सहकार आयुक्त आणि राज्य माहिती विज्ञान अधिकारी हे सदस्य म्हणून काम पाहतील.

Digital Agriculture
Raigad Sakharchauth Ganeshotsav: यंदा 'अंगारकी'च्या दुर्मिळ योगावर रंगणार 'साखरचौथ' गणेशोत्सव

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय टास्क फोर्स

प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील आव्हानांवर मात करण्यासाठी 'जिल्हास्तरीय कृती दल' गठित करण्यात आले आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या कृती दलाचे अध्यक्ष असतील.

या समितीत निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांचा समावेश असेल. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

Digital Agriculture
Sanjay Raut Letter: एफडीएच्या कारवाईमुळे अधिकार्‍यांचे रेटकार्ड वाढले; संजय राऊत यांचे तुकाराम मुंढे यांना पत्र

या निर्णयामुळे राज्यातील कृषी क्षेत्राला डिजिटल तंत्रज्ञानाची मोठी जोड मिळणार असून, शासकीय योजना आणि सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्यास मोठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news