Madgaon Express Delay : मडगाव एक्‍स्‍प्रेसची सतत रखडपट्टी

११ तासांचा प्रवास १७ ते १८ तासांवर : कोकणवासीय त्रस्‍त
Madgaon Express Delay
Madgaon Express Delaypudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या मडगाव एक्सप्रेसच्या लेटमार्कमुळे गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसहकोकणवासीय त्रस्त आहे. मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणारी ही गाडी कधीच वेळेत सुटत नाही. एवढेच नाही तर प्रवासातही मोठी रखडपट्टी होते. त्यामुळे एलटीटी मडगाव सुमारे ११ तासांचा प्रवास १७ ते १८ तासांवर पोहचत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर दररोज धावणाऱ्या कोकणकन्यासह तुतारी, मांडवी, जनशताब्दी या गाड्या नेहमीच हाउसफुल असल्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणारी ट्रेन नंबर ११०९९ मडगाव एक्सप्रेस ही गाडी कोकणवासियांसाठी फायदेशीर ठरत आहे. ही गाडी सुपरफास्ट असल्यामुळे या गाडीने प्रवास करण्यासाठी कोकणी माणसाची मोठी पसंती आहे.

Madgaon Express Delay
Air Travel Inflation India : विमानसेवांच्या महागाईचे उड्डाण

गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठीही ही गाडी फायदेशीर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, रत्नागिरी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी या स्टेशनवर ही गाडी थांबत असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या आजूबाजूच्या तालुक्यांतील अनेकजण या गाडीने प्रवास करतात.

शनिवार, रविवार, मंगळवार व शुक्रवार अशी चार दिवस एलटीटी येथून सुटते. मध्यरात्री गाडी असल्यामुळे या गाडीचे आरक्षित तिकीटही सहज मिळते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ही गाडी प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणारी ही गाडी कधीच वेळेस सुटत नाही.

Madgaon Express Delay
Mumbai Bank Fraud : ८० कोटींचा बँक घोटाळा;सीबीआयचे मुंबईत छापे

मंगळवार २४ नोव्हेंबरला ही गाडी पहाटे ३.४५ ला सुटली. तर सावंतवाडीला दुपारी सव्वा तीन वाजल्यानंतर पोहचली. सावंतवाडीला या गाडीचा पोचायचा टाइमिंग सकाळी ८.३८ आहे. म्हणजेच ही गाडी तब्बल ७ तास विलंबाने पोहचली. ही गाडी मडगावला सकाळी ११.५५ वाजता पोहचते. ती सायंकाळी ५ वाजता पोहचली. हा लेटमार्क गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे प्रवास लांबत असून प्रवाशांना ताटकळत स्टेशनवर बसावे लागत आहे.

नियमित गाड्या बऱ्या

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्या ठरलेल्या वेळेत पोहचत असल्यामुळे या गाड्या प्रवासाला बऱ्या, अशी प्रतिक्रिया कोकणवासीयांनी व्यक्त केली. सुपरफास्ट गाडी असताना पॅसेंजरसारखी गाडी धावणार असेल तर रेल्वेने गाडीचे सुपरफास्ट नामकरण बदली करावे, असं मत कोकणवासीयांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.