Mumbai Bank Fraud : ८० कोटींचा बँक घोटाळा;सीबीआयचे मुंबईत छापे

स्टार हाऊसिंग फायनान्सच्या संचालकांवर कारवाई
Bank Fraud
Bank Fraudpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : ८० कोटी १५ लाख रुपयांच्या बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने मुंबईसह उदयपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या संचालकांशी संबंधित आणि अन्य अशा एकूण सहा ठिकाणांवर बुधवारी छापे टाकण्यात आले. या कारवाईत तपासाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य साहित्य सीबीआयच्या हाती लागले आहे.

नॅशनल हाऊसिंग बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, कंपनीचे संचालक आणि काही अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, लेखा नोंदींमध्ये फेरफार आणि गैरवर्तनासंबंधी आरोप ठेवण्यात आले आहेत.

Bank Fraud
BMC : दाऊदची इमारत मशीद नव्‍हे!

सीबीआयच्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कर्जांचे वितरण केल्याचे दाखवून निधी वळवल्याचा आरोप आहे. या कथित गैरव्यवहारामुळे नॅशनल हाऊसिंग बँकेचे ८०.१५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी सीबीआयने मुंबई आणि उदयपूर येथील सहा ठिकाणांची झाडाझडती घेतली. कविष जैन, अभयकुमार जिलेदार पाल, श्वेता दिलीप मेहता, योगेश नारायणभाई लिम्बाचिया अशी कंपनीच्या संचालकांची नावे आहेत.

Bank Fraud
Mumbai Firing : माहीममध्ये पी.सी.जैन ज्वेलर्सवर गोळीबार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.