Air Travel Inflation India : विमानसेवांच्या महागाईचे उड्डाण

वाणिज्य मंत्रालयः हवाईसेवा ३५.५२ टक्क्यांनी महागली
Air Travel Inflation India
प्रातिनिधिक छायाचित्र.file photo.
Published on: 
Updated on: 

मुंबई : जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत हवाई प्रवासी सेवांमधील महागाई वार्षिक आधारावर ३१.९४ टक्क्यांवरून ३५.५२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर, सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन (रोखे व्यवहार) सेवांच्या किमतीत ६.९३ टक्क्यांची घट झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली.

‘सर्व्हिस प्रोड्युसर प्राईस इंडेक्स’ (एसपीपीआय) नुसार, आधारभूत वर्ष २०२२-२३ नुसार विमान वाहतूक, बँकिंग, विमा, दूरसंचार आणि रेल्वेसह सात सेवा क्षेत्रांमधील महागाई काढण्यात आली आहे. हवाईसेवा मूल्य निर्देशांक आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतील १२६.४ वरून दुसऱ्या तिमाहीत १२७.८ वर पोहचला आहे.

Air Travel Inflation India
AC Local Train Attack : झोपमोड केल्याने प्रवाशाचा रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला

त्याच कालावधीत, सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन सर्व्हिस प्राईस इंडेक्स ८९.९ वरून ८६.० वर खाली आला आहे. वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, हा अहवाल केवळ सात सेवा क्षेत्रांचा विचार करतो. संपूर्ण सेवा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत नाही. परिणामी, या सात सेवांना एकत्रितपणे कोणतेही ‘वेटेज’ (भार) दिलेले नाही.

बँकिंग सेवांमधील महागाई आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतील ४.९८ टक्क्यांवरून दुसऱ्या तिमाहीत ३.९६ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. तथापि, ‘बँकिंग सर्व्हिस कॉन्ट्रिब्युशन इंडेक्स’मधील महागाई पहिल्या तिमाहीतील २.६२ वरून ३.८६ टक्क्यांवर गेली आहे.

पेन्शन फंड व्यवस्थापन सेवांमधील महागाई आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतील ५.४८ टक्क्यांवरून दुसऱ्या तिमाहीत १.०१ टक्क्यांवर आला आहे. ‘पेन्शन फंड व्यवस्थापन सेवा मूल्य निर्देशांक’ ११३.६ वरून १०९.५ वर आला आहे. विमासेवांमधील महागाई ०.९८ टक्क्यांवरून कमी होऊन ०.४९ टक्के झाली आहे.

Air Travel Inflation India
Mumbai Bank Fraud : ८० कोटींचा बँक घोटाळा;सीबीआयचे मुंबईत छापे

‘विमासेवा मूल्य निर्देशांक’ १०२.९ वरून दुसऱ्या तिमाहीत १०३.२ वर गेला आहे. दूरसंचार सेवांमधील महागाई ०.७२ टक्क्यांवरून कमी होऊन ०.५४ टक्के झाली आहे. ‘दूरसंचार सेवा मूल्य निर्देशांक’ सलग चौथ्या तिमाहीत ११२.२ या पातळीवर स्थिर राहिला आहे.

रेल्वेसेवांमध्ये किरकोळ वाढ

रेल्वेसेवांमधील महागाई आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीतील १.२७ टक्क्यांवरून दुसऱ्या तिमाहीत १.३८ टक्क्यांवर पोहचली आहे. रेल्वे मालवाहतूक सेवांमधील महागाई ०.१० टक्क्यांवरून वाढून ०.९९ टक्के झाली आहे. ‘रेल्वे मालवाहतूक सेवा मूल्य निर्देशांक’ १०३.३ वरून १०२.३ वर आला आहे. दुसरीकडे, रेल्वेप्रवासी सेवांमधील महागाई ३.५० टक्क्यांवरून कमी होऊन २.१७ टक्के झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.