Maharashtra Legislative Assembly : विधान परिषद लोकशाहीचा आधारस्तंभ

शतक महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुकोद्गार
Maharashtra Politics
शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणारे विधान परिषद हे देशातील सर्वात जुने सभागृह असून, या सभागृहाचा एक गौरवशाली इतिहास आहे. File Photo
Published on
Updated on

मुंबई : शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणारे विधान परिषद हे देशातील सर्वात जुने सभागृह असून, या सभागृहाचा एक गौरवशाली इतिहास आहे. विधान परिषद सभागृहाला एक परंपरा लाभली असून, भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक संस्थांपैकी महाराष्ट्रातील राज्य विधान परिषद आहे, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी काढले.

स्वर्गीय जगन्नाथ शंकरशेट, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारख्या महान व्यक्तींचा पदस्पर्श या वास्तूला झाला असून, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही बॉम्बे विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले असल्याची आठवण सांगत आपल्या सर्वांसाठी ही गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

Maharashtra Politics
Maharashtra Elections : अनेक सरकारी अधिकारी उतरणार विधानसभेच्या रिंगणात

महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सव सोहळा मंगळवारी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झाला. शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट वक्ते यांचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी शतकमहोत्सवी वर्षानिमित्त 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी येतात जातात; पण हे ग्रंथ कायम राहत, इतिहासाचे जतन करतात, असे सांगत हा ग्रंथ राजकीय अभ्यासक, विद्यार्थी, युवा पिढी आदींसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विधिमंडळाच्या सभागृहातील सदस्य लाखो-कोट्यवधी लोकांचे प्रतिनिधित्व करत असतात. सभागृहात अनेक सदस्य सर्वसामान्य जनतेशी जोडले गेलेल्या प्रश्नावर आवाज उठवतात. सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करतात, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारच्या अडीच वर्षांतील कामगिरी आणि महिलांसाठ आणलेल्या योजनांचा ऊहापो राष्ट्रपतींसमोर केला.

पुरस्कारामध्ये भेदभाव न करत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ह सदस्यांना पुरस्कार दिला असल्या सांगत मुख्यमंत्री म्हणाले पुरस्कारामध्ये काँग्रेसचे बाळासाहे थोरात यांचाही समावेश आहे. ते चांगल व्यक्ती असले तरी ते चुकीच्या ठिकाण आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगतान सभागृहात एकच हास्यकल्लोल उडाला. तसेच ओठात एक आणि पोटात एक... असे नसलेले, बाहे आणि सभागृहातही तसेच बोलता असे भरतशेठ गोगावले, असा उल्लेख करताच सभागृहात हास्यस्फोट झाल सुनील प्रभू यांचा उल्लेख करत ते येत येता राहिले आहेत, असे म्हणता सर्वांनी बाके वाजवून मुख्यमंत्र्यांच्य वक्तव्याला दाद दिली. त्याचबरोब वडिलांचा वारसा जपणारे, अजातश असलेले निरंजन डावखरे यांचे नाव घे त्यांच्याकडे कधी मोबाईल देऊ नक असा हळुवार चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

Maharashtra Politics
आयआयटीच्या 22 विद्यार्थ्यांना कोटीपेक्षा अधिक पॅकेज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news