Maharashtra Elections : अनेक सरकारी अधिकारी उतरणार विधानसभेच्या रिंगणात

सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा स्वेच्छानिवृत्ती घेत शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश
Legislative Council Elections
राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच आता सरकारी अधिकाऱ्यानांही विधानसभा निवडणुकीची लगीनघाई झाली आहे.File Photo
Published on
Updated on

मुंबई : राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच आता सरकारी अधिकाऱ्यानांही विधानसभा निवडणुकीची लगीनघाई झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी काही मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी प्रयत्नशील आहेत.

मंत्रालयात सहसचिवपदी असलेल्या सिद्धार्थ खरात यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत मंगळवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. सिद्धार्थ खरात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Legislative Council Elections
चालकरहित, ‘अपघातमुक्त’ कार!

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत असणारे अभिमन्यू पवार यांना भाजपाने विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. त्यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच प्रयत्नात आमदारकीची निवडणूक जिंकली. तेव्हापासून मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. कोण-कोण इच्छुक ?

निवडणूक लढविणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर यांचेही नाव समोर येत आहे. खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमीत वानखेडे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

Legislative Council Elections
कोल्हापूर : शिक्षकदिनी जिल्ह्यातील शाळा बंद

दरम्यान, माजी मंत्री असलेले छगन भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहिलेले संदीप बेडसे विधानसभा निवडणुकीत आपले नशीब अजमावून पाहिले आहे. युती सरकारमध्ये महादेव शिवणकर यांचे खासगी सचिव राहिलेल्या सुबोध मोहिते यांनी राजकारणात उडी घेत थेट दिल्ली गाठली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news