आयआयटीच्या 22 विद्यार्थ्यांना कोटीपेक्षा अधिक पॅकेज

1,979 विद्यार्थ्यांपैकी 1,475 जणांना मिळाली नोकरी; वर्षाला 23.50 लाखांचे पॅकेज
22 IIT students get more than one crore package
आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये आयआयटीच्या 22 विद्यार्थ्यांना कोटींपेक्षा अधिक पॅकेज मिळाले.Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आयआयटीच्या प्लेसमेंटमध्ये आयआयटीच्या 22 विद्यार्थ्यांना कोटींपेक्षा अधिक पॅकेज मिळाले आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 75 टक्के विद्यार्थ्यांनाच नोकर्‍या मिळाल्या आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांच्या सरासरी पॅकेजमध्ये 7.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 21 लाख 80 हजार इतके पॅकेज होते, त्या तुलनेत यंदा 23 लाख 50 हजार रुपये इतके वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

आयआयटी मुंबईने प्लेसमेंट अहवाल जाहीर केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कोटीच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे. 1 हजार 979 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये मुलाखती दिल्या, तर 1 हजार 475 विद्यार्थ्यांना नोकर्‍यांचे ऑफर लेटर मिळाले आहे. या प्लेसमेंट उपक्रमात सहभागी झालेल्या 1 हजार 979 पैकी 22 जणांना वार्षिक एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असे पॅकेज मिळाले आहे; तर गेल्यावर्षी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक 21.8 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते. यंदा साडेसात टक्क्यांची वाढ होऊन सरासरी वार्षिक पॅकेज 23.50 लाखांवर पोहोचले आहे. मात्र, प्लेसमेंट उपक्रमात सहभागी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त75 टक्के जणांना नोकरी मिळाली आहे.

* यंदा प्लेसमेंटमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 75 टक्के विद्यार्थ्यांनाच नोकर्‍या मिळाल्या. मात्र, यंदा विद्यार्थ्यांच्या सरासरी पॅकेजमध्ये 7.7 टक्क्यांनी वाढ.

* परदेशामध्ये 78 जणांना नोकर्‍या मिळाल्या, तर भारतातील बहुद्देशीय कंपन्यांमध्ये 775 जणांना नोकर्‍या मिळाल्या.

* विद्यार्थ्यांना मिळालेल्या पॅकेजची सरासरी वार्षिक 23.50 लाख रुपये.

* सर्वात कमी म्हणजेच चार ते सहा लाख रुपये वार्षिक पॅकेज स्वीकारणारे दहा विद्यार्थी आहेत. त्याशिवाय 68 विद्यार्थ्यांनी वार्षिक सहा ते आठ लाख आहे.

प्लेसमेंट अहवाल

* 10 विद्यार्थ्यांना वार्षिक चार ते सहा लाख रुपयांची ऑफर

* 22 विद्यार्थ्यांना एक कोटीपेक्षा जास्त वार्षिक पॅकेज

* 23.50 सरासरी वार्षिक पॅकेज

* 75 टक्के ऑफर मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी

* 78 विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आंतरराष्ट्रीय ऑफर्स

* 364 सहभागी कंपन्या

* 558 विद्यार्थ्यांना वार्षिक

* 20 लाखांपेक्षा जास्त ऑफर

* 1,979 विद्यार्थ्यांचा सहभाग

* 1,475 विद्यार्थ्यांना ऑफर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news