Lalbaugcha Raja darshan: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीही तुफान गर्दी; बॅरिकेड्स तुटले, पोलिसांची तारांबळ

मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाही.
Lalbaugcha Raja
Lalbaugcha RajaFile Photo
Published on
Updated on

Lalbaugcha Raja darshan

मुंबई : मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाही. मध्यरात्री १२ वाजताही लालबाग परिसरात हजारो भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावण्यात आलेले मुंबई पोलिसांचे पिवळे बॅरिकेड्स भाविकांच्या गर्दीच्या दबावामुळे हलताना दिसत आहेत. काही ठिकाणी बॅरिकेड्स पडल्याचेही व्हिडीओमध्ये दिसून येते. त्यामुळे गर्दीतून वाट काढताना पोलिसांच्या वाहनांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

Lalbaugcha Raja
Third Mumbai Ganpati Decoration: गणेशोत्सव देखाव्यातून तिसरी मुंबईविरोधात जनजागृती

मध्यरात्र उलटून गेली असतानाही लहान मुले, महिला आणि वृद्ध भाविक मोठ्या संख्येने रांगेत उभे आहेत. तासनतास प्रतीक्षा करत हे भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आतुर असल्याचे चित्र आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून माईकवरून शांतता राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, भाविकांची मोठी गर्दी कायम असल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे.

माहेरवाशीण गौराईचे घरोघरी आगमन

गणरायाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौराईचे स्वागत गुरुवारी महामुंबईत झाले. गौराईची पावले दारात उमटली आणि तिच्या आगमनाने घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौराई आणि चौथ्या दिवशी शंकरोबाचे आगमन होते. त्यानुसार गुरुवारी गौराईचे आगमन झाले. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणले. माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौराईचा पाहुणचार अगदी माहेरवाशीणीप्रमाणेच करण्याची परंपरा आजही जपली जाते. गौराईला लखलखीत दागदागिने, मोत्याची नथ, विविध फुलांची आकर्षक सजावट आणि पारंपरिक कोळी वेशभूषेने सजविण्यात आले. महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत गौराईचे औक्षण करून तिचे मनोभावे स्वागत केले.

Lalbaugcha Raja
Korgao Chaupati Ganpati | दीड हजार कुटुंबे, पण गणपती एकच! पेडणेतील कोरगाव चौपाटीच्या बाप्पाची अनोखी परंपरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news