

Water Shortage Solution
मुंबई : कुर्ला व घाटकोपरमध्ये कमी दाबाचा प्रश्न असल्याने येथे नवीन जलवाहिन्या टाकण्यासह जुन्या जलवाहिन्या बदलणे व जलवाहिन्यांचे आकारमान वाढवण्याचे काम महापालिका हाती घेणार आहे. वर्षभरात या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.
कुर्ला पश्चिमेकडील वृंदावन सोसायटी, डॉ. आंबेडकर नगर, खाडी नं.3. केबिनच्या विरुद्ध बाजूला भूमिगत टाकीसह उदंचन केंद्राचे बांधकाम करणे, पाईप लाईन रोडवरील कुर्ला नर्सिंग होमपासून ते लक्ष्मणराव यादव मंडई, एस, जी, बर्वे मार्ग येथील कुर्ला मार्केट पंपिंग पर्यंत 300 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
लोहारचाळ, गफूर खान इस्टेट, कुर्ला येथील 100 मिमी व्यासाची जलवाहिनी बदलणे व एन विभागातील ए कॉलनी, भटवाडी, घाटकोपर पश्चिम येथे 100 मिमी व्यासाची जलवाहिनी बदलणे, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर येथील पाणीपुरवठयात सुधारणा करण्यासाठी 900 मिमी व्यासाच्या (नारायण नगर आउटलेट) जलवाहिनीवरून नवीन 150 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
कुर्ला-अंधेरी रस्त्यालगत कब्रस्तान कंपाऊंड ते राम जानकी मंदिर लेन, येथे 150 मिमी नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तर न्यू माणिकलाल इस्टेट, माणिकलाल मैदानाजवळ, घाटकोपर येथे 100 मिमी व्यासाची जलवाहिनी बदलण्यासह व्ही.पी.एस. रोड क्रमांक 1, विक्रोळी पार्क 9 साईट, विक्रोळी जुन्या 250 मिमी व 300 मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.