

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेल्या कुलाब्यातील प्रभाग क्रमांक 227 मधील मतदारांनी गुरुवारी मतदानासाठी निरुत्साह दाखवला. जेमतेम या भ्रभागात 25 टक्के मतदान झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. येथील मतदारांनी मतदान न करता राजकीय पक्षांवर आपली नाराज व्यक्त केल्याची चर्चा आहे. येथे झालेल्या कमी मतदानाचा फायदा कोणाला, हे उद्याच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
कुलाबा प्रभागातील जागावाटपावरून भाजपामध्ये मोठी नाराजी होती. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातच तिघांना उमेदवारी दिल्यामुळे येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
प्रभाग क्रमांक 227 मध्ये राहुल नार्वेकर यांच्या बहीण डॉ. गौरवी शिवलकर नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने या प्रभागातून रेहना शेख या मुस्लिम उमेदवाराला उतरवले आहे. त्यामुळे काही मराठी इच्छुक पदाधिकारी नाराज होते. त्यामुळे या प्रभागातील मतांच्या टक्केवारीमध्ये मोठी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
2017 मध्ये या प्रभागातून हर्षित नार्वेकर निवडून आल्या होत्या. यावेळी हर्षिता यांना शिवसेनेच्या 225 प्रभागातून उमेदवारी देण्यात आली. या प्रभागात शिवसेनेच्या सुजाता सानप 2017 मधील निवडून आल्यामुळे
त्यांनी शिवसेनेच्या वतीने भाजप विरोधात निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. या सर्व घडामोडीमुळे 225, 226 व 227 प्रभागातील मतांची टक्केवारी घसरल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रभागात 46 हजार 36 मतदार असून यात 27 हजार 506 पुरुष तर महिला मतदारांची संख्या 18 हजार 58 इतकी आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत या प्रभागातून राहुल नर्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर निवडून आले होते. यावेळी मकरंद नरवेकर 226 मधून निवडणूक लढवत आहेत. 2017 मध्ये या प्रभागातून हर्षित नार्वेकर निवडून आल्या होत्या.