

मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने, आंध्र प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या 51 व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर झाली. महाराष्ट्राचा ‘ब’ गटात समावेश असून उत्तराखंड व गुजरात हे अन्य दोन संघ या गटात आहेत. 15 ते 18 जानेवारी या कालावधीत हे सामने होतील. महाराष्ट्राचा सामना पहिल्या दिवशी सायंकाळच्या सत्रात गुजरातबरोबर होईल.
स्पर्धेची गटवारी खालीलप्रमाणे.
1) अ गट :- 1) हरियाणा, 2) हिमाचल प्रदेश, 3) ओडिशा.
2) ब गट :- 1) उत्तराखंड, 2) महाराष्ट्र, 3) गुजरात
3) क गट :- 1) साई, 2) कर्नाटका, 3) तेलंगणा
4) ड गट :- 1) राजस्थान, 2) मध्य प्रदेश, 3) प. बंगाल
5) ई गट :- 1) उत्तर प्रदेश, 2) चंदीगड, 3) दिल्ली
6) फ गट :- 1) गोवा, 2) पंजाब, 3) जम्मू-काश्मीर, 4) झारखंड
7) ग गट :- 1) तामिळनाडू, 2) पुद्दुचेरी, 3) विदर्भ, 4) छत्तीसगड
8) ह गट :- 1) आंध्र प्रदेश, 2) बिहार, 3) मणिपूर, 4) केरळ