Konkan Railway Marathi language: महाराष्ट्रात मुख्यालय, कोकणात सर्वाधिक मार्ग; तरी कोकण रेल्वेच्या वेबसाइटवर मराठी १४ व्या क्रमांकावर!

इंग्रजी पहिल्या व हिंदी दुसऱ्या स्थानावर, गोवा कोकणी सातव्या, तर गुजराती मराठीच्‍या खूप आधी आठव्या स्थानावर
Railway
RailwayPudhari
Published on: 
Updated on: 

राजेश सावंत

मुंबई: महाराष्ट्रातील नवी मुंबईमध्ये मुख्यालय व सर्वाधिक मोठा मार्ग कोकणातून जाणारा, येथील भाषाही मराठी,पण कोकण रेल्वेच्या वेबसाईटमध्ये मात्र मराठी भाषेला १४ वे स्थान देण्यात आले आहे.

इंग्रजी भाषेला पहिले स्थान असून हिंदी भाषेला दुसरे स्थान, तर गोवा कोकणी भाषेला सातवे व गुजराती भाषेला आठवे स्थान देण्यात आले आहे. मणिपुरी, कानडा, मल्याळम भाषेलाही मराठी भाषेपेक्षा उच्च स्थान देण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने आपली वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटमध्ये कोकण रेल्वेच्या माहितीसह कोणती गाडी कुठून सुटते, त्याचा वेळ काय, गाडीचे लोकेशन, रेल्वे स्टेशनवरील माहिती व अन्य सेवा सुविधांची माहिती या वेबसाईटद्वारे प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Railway
ED Raid: स्त्रीबीजांची अवैध विक्री! ईडीचे ११ ठिकाणी छापे; ४० हून अधिक महिलांची फसवणूक झाल्याचा संशय

एवढेच नाही तर कामगार भरती प्रक्रियेची माहिती येथेच प्रसिद्ध करण्यात येते. प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियाही याच वेबसाईटद्वारे प्रसिद्ध करण्यात येतात. याच वेबसाईटवर प्रेस नोटद्वारे रेल्वेने केलेल्या कामाची माहिती प्रसार माध्यमांसाठी उपलब्ध केली जाते.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांतून देशी-विदेशी पर्यटक व नागरिक प्रवास करत असले तरी सर्वाधिक प्रवास कोकणवासीय करतात. कोकणवासीयांची मायबोली मराठी आहे. त्यामुळे कोकण रेल्वेसंदर्भात काही माहिती हवी असेल तर वेबसाईटवर जाऊन शोधली जाते. परंतु वेबसाईटवर भाषा निवडण्याची जेथे उपलब्धता केली आहे. तेथे क्लिक केल्यावर सुरुवातीला इंग्रजी व त्यानंतर हिंदी भाषेचा पर्याय येतो.

Railway
Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड डिसेंबर २०२८ पर्यंत! चौथ्या टप्प्याच्या कामाने पकडला वेग

त्या खालोखाल आसामी, बंगाली, बडो, डोंगरी, गोवा कोकणी, गुजराती, कानडा, कश्मिरी, मैथिली, मल्याळम मनिपुरी या भाषेनंतर मराठी भाषेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण मार्गावर प्रवास करणाऱ्या कोकणी नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वाधिक मार्ग महाराष्ट्रात

कोकण रेल्वेची रोहा ते ठोकूर एकूण लांबी सुमारे ७४१ किमी आहे. यात महाराष्ट्र म्हणजे कोकणातील मार्ग सर्वाधिक मोठा आहे. यात कोकण रोहा (रायगड) ते मडुरे (सिंधुदुर्ग) ३७५ किलोमीटर, गोवा ११० किलोमीटर व कर्नाटक २४५ किलोमीटर इतका आहे.

मराठी भाषेला प्राधान्य का नाही?

कोकण रेल्वे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांतून धावते. सर्वाधिक प्रवासी कोकणातील मराठी भाषिक आहेत. गोव्यातही प्रवास करणारे बहुतांश मराठी आहेत. मग मराठी भाषेला दुय्यम स्थान का? मराठी भाषेला सुरुवातीला स्थान का नाही, असे अनेक सवाल आता कोकणवासीय मुंबईकरांकडून केले जात आहेत.

हा तर मराठी माणसांचा अवमान

मराठी भाषेबद्दल कोकण रेल्वेला एवढा तिरस्कार का ? मराठी भाषा आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी जाहीर करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया कोकणवासीय उदय मसूरकर यांनी व्यक्त केली. कोकण रेल्वेच्या वेबसाईटमध्ये मराठी भाषेला पहिल्या क्रमांकाचे स्थान असायला हवे होते. पण थेट हे स्थान चौदाव्या क्रमांकावर देऊन त्यांनी करोडो मराठी माणसांचा अवमान केला असल्याचे मत प्रतीक्षा सावंत-रावराणे यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news