ED Raid: स्त्रीबीजांची अवैध विक्री! ईडीचे ११ ठिकाणी छापे; ४० हून अधिक महिलांची फसवणूक झाल्याचा संशय

बदलापूर, उल्हासनगर, नाशिक आणि बारामतीमध्ये कारवाई; स्त्रीबीज काढण्यासाठी पैशांचे आमिष आणि बनावट कागदपत्रे वापरल्याचा संशय
ED Raid
ED RaidPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वारंवार स्त्रीबीज काढून त्यांची विक्री केल्याच्या संशयावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रात ११ ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात ४० हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय आहे. शुक्रवारी आणि शनिवारी बदलापूर, उल्हासनगर, नाशिक आणि बारामती येथे ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात महिलांना प्रत्येक वेळी स्त्रीबीज काढण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप आहे.

ED Raid
ST Bank Inquiry: एसटी बँकेत लाखो रुपयांची अनियमितता; चौकशीसाठी सात अधिकाऱ्यांची नियुक्ती

स्त्रीबीजांची निर्मिती वाढवण्यासाठी महिलांना काही दिवस हार्मोनची इंजेक्शने दिली जात होती. त्यानंतर तपासण्या करून त्यांना स्त्रीबीज काढण्यासाठी विविध कृत्रिम गर्भधारणा उपचार केंद्रांमध्ये नेले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

एका महिलेवर तब्बल ३३ वेळा स्त्रीबीज काढण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप आहे.महिलांची ओळख लपवण्यासाठी बनावट आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रे वापरल्याचाही संशय आहे.

तक्रारीनंतर प्रकरण उघड

एका महिलेने स्त्रीबीजदान केल्यानंतर ठरलेली रक्कम मिळाली नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात मध्यस्थ, डॉक्टर आणि उपचार केंद्रांशी संबंधित व्यक्तींची नावे समोर आली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले आहे.

ED Raid
Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड डिसेंबर २०२८ पर्यंत! चौथ्या टप्प्याच्या कामाने पकडला वेग

स्त्रीबीजदानासाठी कायद्याने नियम ठरवून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाले आहे का आणि या प्रकरणात पैशांची अफरातफर झाली आहे का, याचाही ईडी तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news