Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड डिसेंबर २०२८ पर्यंत! चौथ्या टप्प्याच्या कामाने पकडला वेग

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार? गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या चौथ्या टप्प्याचे काम वेगात!
Goregaon Mulund Link Road
Goregaon Mulund Link RoadPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील कामाने आता वेग पकडला आहे. २७ मार्च २०२६ पासून या कामाचा प्रारंभ झाला आहे.

या टप्प्या अंतर्गत मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या छेद नाक्यावर भविष्यात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इंटरचेंज उभारण्यात येणार आहे. हा लिंक रोड २०२८ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Goregaon Mulund Link Road
Galai Devi Temple: हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळते, अशी श्रद्धा! नावजेच्या गैलाई देवीचे महत्त्व जाणून घ्या

दरम्यान, दोन भागांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील विद्यमान उड्डाणपूलावर दुसऱ्या स्तरावरील नाहूर-ऐरोली टोलनाका दरम्यान केबल स्टेड उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

या उड्डाणपुलाची लांबी १,३३० मीटर असून त्यात २७० मीटर लांबीचे पोहच रस्ते समाविष्ट आहेत. महामार्ग क्रॉसिंग साठी १८० मीटर लांबीचा स्पॅन असून त्याची रुंदी ४० मीटर रुंदीच्या म्हणजे दोन्ही बाजूला पाच-पाच अशा दहा लेन असणार आहेत. तर उर्वरित भागात २४ मीटर रुंदीचा म्हणजेच दोन्ही बाजूला तीन-तीन अशा सहा लेन असणार आहेत.

Goregaon Mulund Link Road
Mumbai School Bus Safety: एका हातात स्टेअरिंग, तर दुसऱ्या हातात मोबाईल!स्कूल बसचालकांचा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ

सध्याच्या वाहतूक समस्यांवर तत्काळ उपाय म्हणून नाहूर ते ऐरोली टोल नाका दरम्यान १६०० मीटर लांबीच्या विद्यमान रस्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

त्रयस्थ संस्थेची केली नेमणूक

गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या कामाची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कामाचे लेखापरीक्षण करण्यासाठी व्हीजेटीआय मुंबई या राज्य शासनाच्या तालिकेतील अभियांत्रिकी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी संस्थेला ६ कोटी ९ लाख ५३ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news