Konkan Hapus Mango: मुंबई एपीएमसीत चालू हंगामात पहिल्यांदाच कोकण हापूसच्या 6325 पेट्यांची आवक

हापूसच्या हंगामात पहिल्यांदाच कोकण हापूसने पार केला सहा हजार पेट्यांचा टप्पा
Mango
MangoPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई : मुंबई एपीएमसीत सोमवारी पहिल्यांदाच कोकणातून हापूसचा हंगाम सुरु झाल्यानंतर सहा हजार पेट्यांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत पाच पेटीपासून दीड ते दोन हजार पेट्यांची आवक डिसेंबर अखेरपासून14 मार्चपर्यंत झाली. मात्र गुढीपाडव्याच्या पाच दिवस आधी मोठी आवक झाली. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक खूपच अल्प प्रमाणात आहे.

Mango
Hereditary Jobs Safai Workers: वारसा हक्काच्या नोकरीची प्रकरणे सहा महिन्यांत निघणार निकाली

सोमवारी बाजारात एका पेटीसाठी 3 हजार ते 9 हजार दर होता. विशेष म्हणजे परराज्यातील हापूसच्या 10 हजार 520 पेट्यांची आवक झाली.

मागील काही दिवसात कोकणातून मुबलक येणारा आंबा आता नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दाखल होऊ लागला आहे. रविवारी बाजार बंद असल्याने सोमवारी हापूसची एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाली. हीच आवक उद्या आणि परवा अशी सुरु राहिली तर गुढीपाडव्याला बऱ्यापैकी प्रमाणात हापूस विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

Mango
Rajya Sabha Election Maharashtra: राज्यसभेच्या सहा जागांवर महायुतीचा विजय निश्चित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आवक सुरु झाली आहे. पुढील काळात आवक जरी वाढणार असली तरी, दर मात्र वरचढ राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. कारण मागील काही दिवसात वातावरणात सतत होणारा बदल,पडणारे धुके आणि तापमानामुळे आंब्यावर परिणाम होऊन आंबा खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जरी आंब्याची आवक वाढली तरी दरात कोणताही फारसा फरक होईल असे आत्ता

Mango
Gas Shortage Hotels Impact: गॅस टंचाईचा हॉटेल व्यवसायाला फटका; मुंबईतील 20% हॉटेल्स बंद

तरी वाटत नाही. कारण आंब्याचे झालेले नुकसान पाहता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात निर्यात बंद असल्याने शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news