Mumbai Crime : एमटीएनएल केबल चोरी; १३ अटकेत

दोन मोबाईल फोनसह २०.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; समतानगर पोलिसांची कारवाई
Mumbai Cable Theft Case
Mumbai Cable Theft Casepudhari photo
Published on
Updated on

कांदिवली : समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमिगत एमटीएनएल केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तब्बल १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून २० लाख रुपये किमतीचा जेसीबी आणि ८० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, असा एकूण २० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अशोक नगर क्रॉस रोड क्रमांक ४, कांदिवली पूर्व येथे भूमिगत असलेल्या एम टी एन एल कंपनीच्या १५३ मीटर लांबीच्या २००० पेअरच्या चार केबल, अंदाजे ९ लाख ५०० रुपये किमतीच्या, २२ जून २०२६ रोजी चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी एमटीएनलचे मॅनेजर वीरेंद्र ललताप्रसाद यादव यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mumbai Cable Theft Case
Panvel Orchestra Bar Action : पोलिसांच्या धाडीत बारचा ‘अश्लील’ खेळ उघड!

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींची माहिती मिळवत स्वप्निल अनिल शेलार, सुरेश शिवाजी शिंदे, प्रथमेश दत्तात्रे मालवणकर, सागर नैशिल कांबळे, साहिल शकिल साह, अब्दुल सिध्दीक अहमद शेख, रिझवान मेहताब मलीक, मो. अफजल हसन खान, सुरज उर्फ साहिल दिलावर कालेकर, मनोजकुमार शहब्दिन गुप्ता, मुबारक अली नबीजान अली शहा, आझम अब्दुल गफार खान आणि अब्दुल वहाब सादिक मिया अन्सारी अशा १३ जणांना अटक केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजितसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, स.फौ. रोजश तोंडवाळकर, पोलीस हवालदार जयेश केणी, अतुल ननावरे, तसेच पोलीस शिपाई दौलत साळुंके आणि निलेश भिकले यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

Mumbai Cable Theft Case
Mumbai Water Supply Cost : सरकारी पाण्याचा खर्च वाढतोय, वार्षिक खर्च २२० कोटींच्या घरात

केबल चोरीसाठी जेसीबीचा वापर

आरोपींनी भूमिगत एमटीएनएल केबल चोरी करण्यासाठी जेसीबीचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, उत्तर परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि समतानगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news