Panvel Orchestra Bar Action : पोलिसांच्या धाडीत बारचा ‘अश्लील’ खेळ उघड!

सहा महिला सिंगर पोलिसांच्या ताब्यात
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

पनवेल : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. कोनगाव येथील हॉटेल नाईट रायडर बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी केलेल्या तपासणीत महिला सिंगर ग्राहकांजवळ जाऊन अश्लील हावभाव व बीभत्स वर्तन करताना आढळून आल्या.

विशेष म्हणजे ‘कमरीया लचकेरे बाबु जरा बचके रे’ या गाण्यावर महिला सिंगर ग्राहकांच्या जवळ जाऊन अश्लील हावभाव करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सहा महिला सिंगर, बार मॅनेजर व दोन वेटर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Crime News
Panvel School Theft : घरफोडीचा वेगळाच फंडा; शाळा-कॉलेज लुटणारा चोरटा जेरबंद

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये गैरप्रकार होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सरदार वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कोनगाव येथील नाईट रायडर बारमध्ये पोहोचले.

रात्री सुमारे १२.३५ वा. पोलिसांनी बारमध्ये प्रवेश केला असता तेथे महिला सिंगर, वेटर, ग्राहक व मॅनेजर उपस्थित होते. त्यावेळी महिला सिंगर ‘कमरीया लचकेरे बाबु जरा बचके रे’ या गाण्यावर ग्राहकांजवळ जाऊन अश्लील हावभाव व बीभत्स वर्तन करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी तातडीने महिला सिंगरना बाजूला घेतले, तर वेटर व मॅनेजरचीही चौकशी केली.

सोनम राजेंद्र प्रसाद, श्वेता महेश गुडिया कशप, झुमा तारक दास, शालिनी छरी, प्रवासी जनक बहादुर आणि अंजली चंद या सहा महिला सिंगर तसेच मॅनेजर प्रसन्नकुमार एस. श्रीवास्तव आणि वेटर भीम कौलेश्वर पासवान व मिथुन अयोध्या पासवान यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

Crime News
Mumbai Water Supply Cost : सरकारी पाण्याचा खर्च वाढतोय, वार्षिक खर्च २२० कोटींच्या घरात

पोलिसांनी बारच्या परवान्याची व इतर कागदपत्रांचीही तपासणी केली. बारचा मालक अनंता पाटील असल्याचे कागदपत्रांवरून समोर आले.यावेळी कोणतीही वस्तू जप्त केली नसून पंचनामा ई-साक्ष ॲपमध्ये करण्यात आला.

तळोजानंतर पनवेल चर्चेत

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली महिला वेटर व सिंगरकडून ग्राहकांचे मनोरंजन करताना अश्लील हावभाव व नियमबाह्य प्रकार होत असल्याचे तळोजा आणि पनवेलमधील कारवाईत समोर आले आहे. विशेष म्हणजे, नियमांचे उल्लंघन होत असतानाही काही बारमध्ये अशा प्रकारांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बारमालकांवरही कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news