Kandivali MHADA Redevelopment: कांदिवली समतानगरमधील 22 म्हाडा इमारतींचा पुनर्विकास 1 एप्रिलपासून पुन्हा सुरू

विलंब झाल्यास विकासकावर कारवाई; तीन महिन्यांनी कामाचा आढावा घेणार – मंत्री शंभूराज देसाई
Kandivali Cluster Redevelopment:
Kandivali Cluster Redevelopment: Pudhari
Published on
Updated on

मुंबई : कांदिवली (पूर्व) येथील समतानगरमधील म्हाडा संकूलाच्या मध्यम उत्पन्न गटाच्या 22 इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम 1 एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या कामाच्या प्रगतीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. तसेच या कामात विलंब झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Kandivali Cluster Redevelopment:
Dombivli Hawker Removal: डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर धडक कारवाई; केडीएमसी पथकाची मोठी मोहीम

कांदिवली (पूर्व) येथील समता नगरमधील 22 मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आ. श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. 2017 मध्ये करार होऊनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. या प्रश्नावरून भाजप गटनेते प्रवीण दरेकर, आ. भाई जगताप, आ. अनिल परब, आ. शशिकांत शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. विकासकाकडून राज्यमंत्री व म्हाडा अधिकाऱ्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली जात असल्याने विकासकावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

Kandivali Cluster Redevelopment:
COVID Duty Death: कोविड कर्तव्यात मृत्यू झालेल्या शिपायाच्या कुटुंबाला दिलासा; 50 लाख भरपाईचे आदेश

समतानगर येथील प्रकल्पासंदर्भात राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या प्रकल्पातील 318 निष्कासित सदनिकाधारकांपैकी 310 जणांचे भाडे मार्च 2026 पर्यंत देण्यात आले असून उर्वरित आठ जणांचे भाडे देण्याचे आदेशही देण्यात येतील. तसेच दरवर्षीचे भाडे आगावू देण्याबाबत सूचित केले जाईल, असे आश्वासन दिले, असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले,

Kandivali Cluster Redevelopment:
Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडचा खर्च तब्बल 2,220 कोटींनी वाढला; प्रकल्प आता 14,941 कोटींवर

अधिवेशनानंतर घेणार बैठक

भाडेकरूंना देय असलेल्या भाड्याबाबत कोणतीही तक्रार राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. तसेच अधिवेशन संपल्यानंतर सर्व संबंधितांची या विषयी पुन्हा बैठक घेतली जाईल. या बैठकीस लोकप्रतिनिधी, म्हाडा अधिकारी तसेच गृहनिर्माण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, भाडेकरूंचे प्रतिनिधी यांनाही निमंत्रित केले जाईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news