Dombivli Hawker Removal: डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर धडक कारवाई; केडीएमसी पथकाची मोठी मोहीम

अचानक कारवाईने फेरीवाल्यांची दाणादाण; 250 मीटर परिसरातील ठेले, सामान जप्त
Dombivli Hawker Removal
Dombivli Hawker RemovalPudhari
Published on
Updated on

डोंबिवली : वारंवार सूचना दिल्या आणि कारवाया केल्या, तरीही फेरीवाले डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशन परिसरातीतून हटण्यास तयार नाहीत. दीडेश मीटरच्या आत फूटपाथसह रस्तेही बळकावून बसलेल्या फेरीवाल्यांवर सोमवारी सकाळी फ प्रभाग क्षेत्रचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख मिलिंद गायकवाड आणि वेदपाल तिसांबर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कारवाईची यथेच्छ झोड घेतली. अचानक कारवाई सुरू होताच फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. फेरीवाल्यांना सामान बचावाची संधी न देता त्यांचे सर्व सामान जप्त करण्यात आले. काही सामानाची मोडतोड करण्यात आली.

Dombivli Hawker Removal
COVID Duty Death: कोविड कर्तव्यात मृत्यू झालेल्या शिपायाच्या कुटुंबाला दिलासा; 50 लाख भरपाईचे आदेश

गेल्या दोन महिन्यांपासून फ प्रभाग हद्दीत रेल्वे स्टेशनपासून 250 मीटरच्या आत फेरीवाले वर्दळीच्या पंडित नेहरू रोड, बापूसाहेब फडके रोड, बाजीप्रभू चौक, पाटकर रोड, चिमणी गल्ली परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. सततच्या कारवाईमुळे रस्ते आणि फुटपाथ मोकळे राहत असल्यामुळे डोंबिवलीकर समाधान व्यक्त करत आहेत.

Dombivli Hawker Removal
Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडचा खर्च तब्बल 2,220 कोटींनी वाढला; प्रकल्प आता 14,941 कोटींवर

आयुक्त अभिनव गोयल यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वायत्तता दिली आहे. आयुक्तांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी डोंबिवलीच्या फ आणि ग प्रभागात सुरू आहे. फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर, फेरीवाला हटाव पथक प्रमुख मिलिंद गायकवाड आणि वेदपाल तिसांबर यांच्या उपस्थितीत कारवाई सुरू आहे.

Dombivli Hawker Removal
Maharashtra Heatwave: मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

शोरमा गर्लचा स्टॉल अडगळीत

फ प्रभागाकडून दररोज ही कारवाई सुरू असल्याने नेहरू रोडवरील पाणी पुरी, भेळपुरी विक्रेते बेपत्ता झाले आहेत. दीडशे मीटरच्या आत शोरमा गर्लला खाद्य पदार्थ विक्री करण्यास केडीएमसी परवानगी देते. राजकीय नेते तिला पाठबळ देतात. मग आमच्यावरच अन्याय का ? असा सवाल उपस्थित करणाऱ्या फेरीवाल्यांच्या ठेले आणि सामानासकट या पथकाने शोरमा गर्लचा स्टॉल उचलून अडगळीत आणून उभा केला. सरसकट कारवाई करताना दीडशे मीटरच्या आतील सर्व फेरीवाल्यांवर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीवर फेरीवाले ठाम आहेत. मनसे नेत्यांच्या आशीर्वादाने दीडेशे मीटरच्या आत उभ्या राहिलेल्या शोरमाच्या स्टॉलवर कारवाई होत नसल्याने इतर खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केडीएमसीच्या एकतर्फी कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news