Mumbai Crime : पोयसरमध्ये दहशत माजविणाऱ्या ‘दादा’ टोळीवर मोक्का

मुख्य आरोपी यमेश दरेकर फरार; दोघांना अटक
Mumbai Crime
Mumbai Crimepudhari photo
Published on
Updated on

मुंबई : कांदिवली पूर्वेतील पोयसर परिसरात दहशत माजवून नागरिकांकडून खंडणी उकळणे, मारहाण करणे आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या यमेश दिलीप दरेकर ऊर्फ ‘दादा’ याच्या टोळीवर मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. या प्रकरणात टोळीतील रोहित कृष्णप्रताप सिंग आणि सागर अनिल राठोड या दोघांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी यमेश दरेकर फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.

समतानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ जून २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला आरोपींनी हप्ता न दिल्याच्या कारणावरून कपडे उतरवून शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉड, लाकडी स्टंप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यमेश दरेकर याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

Mumbai Crime
waste to energy project : कचरा प्रकल्पाच्या बदल्यात घेतली मर्सिडीज

या घटनेनंतर जमलेल्या नागरिकांनाही आरोपींनी धमकावले. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात रोहित कृष्णप्रताप सिंग (३३) आणि सागर अनिल राठोड (२२) यांना १५ जून रोजी अटक करण्यात आली. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर यमेश दरेकर ऊर्फ दादा हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.

३७ गुन्हे दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, यमेश दरेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध समतानगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घातक हत्याराचा धाक दाखविणे, शिवीगाळ व मारहाण, विनयभंग, शांतता भंग आणि जीवे मारण्याची धमकी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर दोन वेळा एमपीडीए आणि दोन वेळा तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. रोहित सिंग हा दरेकरच्या टोळीतील सदस्य असून त्याच्याविरुद्ध १३ गुन्हे दाखल आहेत. सागर राठोड याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून, २०२३ मध्ये त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती.

Mumbai Crime
Kurla crane accident : कुर्ल्यात क्रेन कोसळून १२ जण जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news