Juinagar Gold Robbery: नवी मुंबईत फिल्मी स्टाईल दरोडा; २० कोटींचे १६ किलो सोने पळवले

जुईनगर सर्व्हिस रोडवर सोन्याची व्हॅन अडवून चौघांचा थरार; कारच्या काचा फोडून दोघांना मारहाण
Gold theft
Gold theftFile Photo
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई: जुईनगर एमआयडीसीत सोन्याची वाहतूक करणाऱ्या चैन ॲण्ड चैन या शिरवणे एमआयडीसीतील कंपनीच्या व्हॅनला काल रात्री अज्ञात चार व्यक्तींनी जुईनगर सर्व्हिस रोडवर अडवून सशस्त्र दरोडा घातला.

व्हॅनमधून सुमारे १६ किलो सोने लुटण्यात आल्याचा अंदाज आहे. बाजारभावानुसार २० कोटी रुपयांचे सोन्याची किमंती असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून चार पथक तपासासाठी रवाना करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली.

शिरवणे एमआयडीसीत चैन ॲण्ड चैन नावाची सोन्याचा व्यापार करणारी कंपनी आहे. दररोज या कंपनीच्या व्हॅनमधून मुंबईत कंपनीच्या कार्यालयात सोन्याची ने आण केली जाते.

Gold theft
Mangaon Nagar Panchayat Election: रायगडमधील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम

काल गुरुवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी सोने घेऊन निघालेली ही व्हॅन जुईनगर सर्व्हिस रोडवर अडवत कारच्या काचा फोडून सोने भरलेली एक बॅग धमकावत सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कारमधील दोनजणांना मारहाण करून व्हॅनमधील सोने लुटून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या दरोड्यात १६ किलोहून अधिक सोनं लुटल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास २० कोटी रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह संबंधित पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

Gold theft
Navi Mumbai Orchestra Licence: ऑर्केस्ट्रा परवान्यांबाबत आठ आठवड्यांत निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

या दरोड्यामुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांच्या तपासासाठी चार पथक रवाना करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करत संशयित आरोपींची ओळख पटली असून त्यांना ताब्यात घेण्यात येईल. असे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले.

विशेष म्हणजे सोन्याची वाहतूक करताना पोलीसांना याची माहिती देण्यात आली नव्हती. किंबहुना पोलीस संरक्षण ही घेतले नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या परिसरात कोट्यवधींच्या सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर सशस्त्र दरोडा पडल्याने सोन्याच्या वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.