Navi Mumbai Orchestra Licence: ऑर्केस्ट्रा परवान्यांबाबत आठ आठवड्यांत निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या निवेदनावर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे आदेश
Bombay High Court
Bombay High CourtPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: ऑर्केस्ट्रा आणि नृत्य सादरीकरणाच्या परवान्यांबाबत स्पष्टता मिळवण्यासाठी नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनने सादर केलेल्या निवेदनावर आठ आठवड्यांत अंतिम निर्णय घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने असोसिएशनची याचिका निकाली काढताना संबंधित राज्य प्राधिकरणाला हे निर्देश दिले आहेत.

Bombay High Court
Kalyan Badlapur Railway Block: कल्याण-बदलापूरदरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक; काही लोकल फेऱ्या रद्द

नवी मुंबई येथील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस्‌कडे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वैध ऑर्केस्ट्रा परवाने असताना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून त्यांचे परवाने मुदत संपण्यापूर्वीच रद्द केले. ऑर्केस्ट्रा परवाने मुदतीपूर्वीच रद्द केल्याच्या निर्णयाला आव्हान देत असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना गृह विभागाने २७ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा दावा केला. हे परिपत्रक महाराष्ट्र पोलिस कायदा तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार रूममधील अश्लील नृत्यास प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणाऱ्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर काढण्यात आले होते.

Bombay High Court
Siddhi Dalvi Para Swimming: दिव्यांग आणि पॅरा खेळाडूंसाठीची अनोखी 'स्नेह आशा'; सिद्धी दळवीची तीन पदकांची कमाई

असोसिएशनने १४ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडे एक निवेदन सादर करून, त्यात ऑर्केस्ट्रा, लाईव्ह बँड सादरीकरण आणि नृत्य या सर्वांचा समावेश असलेला एक एकत्रित परवाना देण्यासाठी योग्य नियमावली तयार करण्याची मागणी केली होती. तसेच, नवीन नियम तयार होईपर्यंत सध्याच्या नियमांनुसारच असे परवाने दिले जावेत, अशी मागणी केली होती.

तसेच, मागणी ही प्रलंबित निवेदनावर निर्णय घेण्यापुरती मर्यादित आहे. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल घेत खंडपीठाने असोसिएशनचे निवेदन नियमांनुसार असेल, तर त्यावर कायद्यानुसार आठ आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे निर्देश राज्य प्राधिकरणाला देत याचिका निकाली काढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.