Juhu Chowpatty Lights Issue: जुहू चौपाटी अंधारात; दिवे बंद पडल्याने पालिकेवर हलगर्जीपणाचे आरोप

मेंटेनन्स रखडल्यामुळे पर्यटकांची गैरसोय; नव्या कंत्राटदारासाठी निविदा प्रक्रिया सुरू
Juhu Chowpatty Lights Issue
Juhu Chowpatty Lights IssuePudhari
Published on
Updated on

मुंबई : जुहू चौपाटीच्या सौंदर्यकरणांमध्ये भर पडावी यासाठी सुमारे 9 वर्षापूर्वी एलईडी लाईटसह रंग बदलणारे ग्रेझर, वाळूमध्ये विविध स्लोगन दर्शवणारे गो-बी प्रोजेक्टर, फसाड लाइटिंग बसवण्यात आल्या होत्या. याच्या मेंटेनन्ससाठी नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत 11 डिसेंबर 2025 मध्ये संपुष्टात आली. कंत्राटदार नेमण्यामध्ये महापालिकेचा हलगर्जीपणा झाल्यानेे तीन महिने दिव्यांचे मेन्टेनन्स रखडला आहे. परिणामी, चौपाटीवरील अनेक दिवे बंद पडले आहेत.

Juhu Chowpatty Lights Issue
Maharashtra Voting Controversy: मतदान रोखणे म्हणजे लोकशाहीचा खून; शिंदेंचा संताप, चौकशीचे फडणवीसांचे आश्वासन

जुहू चौपाटीवर मुंबईकरांसह देशी-विदेशी पर्यटक फेरफटका मारण्यासाठी येतात. पर्यटकांना ही चौपाटी आकर्षित वाटावी, यासाठी 29 ऑक्टोबर 2016 मध्ये एलईडी दिव्यांसह अन्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रोषणाईचा आनंद लुटता यावा यासाठी दिव्यांच्या मेंटेनन्ससाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी पालिका वार्षिक सुमारे 70 लाख पेक्षा जास्त मोजत होती. तत्पूर्वी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होणे अपेक्षित होते. परंतु कंत्राट संपणार असल्याचे माहित असूनही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले.

Juhu Chowpatty Lights Issue
Mumbai Heatwave: मुंबईत उष्णतेची लाट कायम; तापमान 36 अंशांवर, नागरिक हैराण

जुहू चौपाटीच्या बंद असलेल्या दिव्यांसह गो-बी प्रोजेक्टर यांचेही मेंटेनन्स रखडले आहे. चौपाटीवरील दिव्यांच्या मेंटेनन्ससाठी कंत्राटदार नेमण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवत कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कंत्राटदाराला मेंटेनन्सचे काम दिले जाणार असल्याचे पालिकेच्य वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 2 वर्षासाठी 1 कोटी 36 लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news