Mumbai Heatwave: मुंबईत उष्णतेची लाट कायम; तापमान 36 अंशांवर, नागरिक हैराण

आयएमडीचा यलो अलर्ट सुरूच; दमट हवामानासह उकाड्याची तीव्रता वाढणार
Mumbai Heatwave Alert
Mumbai Heatwave AlertPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई शहर व उपनगरांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मुंबई आयएमडीच्या सांताक्रूझ वेधशाळेमध्ये शनिवार ते सोमवार (21 ते 23 मार्च) या तीन दिवसांमध्ये कमाल तापमान सरासरी 36 अंश सेल्सिअस इतके नोंदले.

Mumbai Heatwave Alert
Rupali Chakankar: रूपाली चाकणकरांच्या बोटाला झालेल्या जखमेमागचं खरं कारण आलं समोर; पाहा Video

गेल्या शनिवारी कमाल तापमानाने पस्तीशी गाठली. रविवारी त्यात थेट दोन अंशांनी वाढ झाल्याने भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेची लाट (यलो अलर्ट) घोषित केली. या अलर्ट सोमवारीही कायम होता. तसेच मंगळवारी 36 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता असल्याने उष्णतेच्या लाटेचा परिणाम मंगळवारीही जाणवण्याची शक्यता वाढली आहे.

Mumbai Heatwave Alert
Rural Livestock Maharashtra: ग्रामीण भागात गुरांचा ‌‘आवसा‌’ झाला दुर्मीळ!

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबई आणि आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. सध्या कर्नाटकच्या दक्षिणेपासून चक्राकार वारे वाहत असून मध्य महाराष्ट्रपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा परिसरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मुंबईत मात्र प्रचंड दमट हवामान असेल, असे आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

Mumbai Heatwave Alert
Anil Parab vs Shinde Sena: विधान परिषदेत परब यांची शिंदे गटावर जोरदार टीका; “हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा”

21 मार्च 35 अंश सेल्सिअस

22 मार्च 37 अंश सेल्सिअस

23 मार्च 38 अंश सेल्सिअस

24 मार्च 36 अंश सेल्सिअस (अपेक्षित)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news