APMC mango arrival : एपीएमसीत तीन दिवसांत हापूसच्या 80 हजार पेट्यांची आवक

कोकण हापूसच्या 44 हजार, तर परराज्यातील हापूसच्या 35 हजार 964 पेट्यांचा समावेश
APMC mango arrival
एपीएमसीत तीन दिवसांत हापूसच्या 80 हजार पेट्यांची आवक pudhari photo
Published on
Updated on

नवी मुंबई : मुंबई एपीएमसीत गेल्या गुरुवारी गुढीपाडव्याला कोकण हापूसच्या केवळ 10 हजार पेट्यांची आवक झाली होती. त्यानंतर कोकण हापूससह परराज्यातील हापूसच्या आवकमध्ये वाढ झाली असून गेल्या तीन दिवसांत तब्बल 80 हजार 22 पेट्यांची एपीएमसीत आवक झाली आहे. यामध्ये कोकण हापूसच्या 44 हजार 58 पेट्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही मार्च महिन्यात अपेक्षित अशी आवक सुरू झालेली नाही. गुढीपाडव्याला यावर्षी 40 हजार पेट्यांनी आवक घटली झाली होती. त्यामुळे हापूसचे दरही 5 ते 9 डझनाच्या पेटीचे 2 ते 8 हजार रुपये असल्याची माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी पुढारीशी बोलताना दिली.

APMC mango arrival
Metro 4 Mulund accident : मेट्रो अपघाताला आरएजेव्ही जबाबदार

गेल्या 20 दिवसांत कोकण हापूसच्या केवळ 70 हजार 331 पेट्यांची, तर परराज्यातील हापूसचे 1 लाख 43 हजार 676 क्रेटची आवक झाली. कोकण हापूसवर यंदा परराज्यातील हापूसने मात केली आहे. तर गेल्या तीन दिवसांत म्हणजे 23 ते 25 मार्चपर्यंत एकूण 80 हजार 22 पेट्यांची एपीएमसीतील घाऊक फळमार्केटमध्ये आवक झाली.

त्यामध्ये कोकण हापूसच्या 44 हजार 58 पेट्या, तर परराज्यातील 35 हजार 964 क्रेटची आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक आवक ही बुधवारी 25 मार्च रोजी 31 हजार 403 पेट्यांची झाली. यात 16,833 पेट्या कोकण हापूस, तर 14,570 क्रेट परराज्यातील हापूसची आवक झाली आहे.

APMC mango arrival
Mithi River cleaning drive : मिठी नदीच्या सफाईचा मुहूर्त पुढील आठवड्यात!

एप्रिलमध्ये आवक वाढल्यास कोकण हापूसचे पाच ते आठ डझन पेटीचे दर कमी होऊन 2000 ते 3500 रुपयांपर्यंत येऊ शकतात. मार्चअखेर देवगड, राजापूर हापूसची आवक आणखी वाढणार आहे.

आवक (23 ते 25 मार्च)

23 मार्च

कोकण हापूस - 13,930

परराज्य - 12,617

एकूण - 26,547

24 मार्च

कोकण हापूस - 13,295

परराज्य - 8,777

एकूण - 22,072

25 मार्च

कोकण हापूस - 16,833

परराज्य - 14,570

एकूण - 31,403

तीन दिवसांत एकूण 80,022 पेट्यांची आवक

  • कोकण हापूस 44,058

  • परराज्य हापूस 35,964

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news