Jogeshwari Blade Attack: क्षुल्लक वादातून ४० वर्षांच्या व्यक्तीवर ब्लेडने प्राणघातक हल्ला

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक व कोठडी; अधिक तपास सुरु
Jogeshwari Blade Attack
Jogeshwari Blade AttackPudhari
Published on
Updated on

मुंबई: क्षुल्लक वादातून विमल नावाच्या एका ४० वर्षांच्या व्यक्तीच्या गळ्यावर त्याच्याच परिचित आरोपीने ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना जोगेश्‍वरी परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या विमलला उपचारासाठी जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून नवीनकुमार नरेश मंडल या २६ वर्षांच्या आरोपी तरुणाला अटक केली.

अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना शनिवारी १५ ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता जोगेश्‍वरीतील ९० फिट रोड, मेट्रो ब्रिजखालील स्तंभ हॉटेलसमोर घडली. विमल आणि नवीनकुमार हे दोघेही एकमेकांच्या परिचित असून अंधेरी परिसरात राहतात.

Jogeshwari Blade Attack
Bangladeshi Nationals Arrest: बांगलादेशी घुसखोरांवर मुंबई पोलिसांचा ‘वॉच’; मालाड, वर्सोवा, अंधेरी, कामाठीपुरा ते बोरिवलीपर्यंत धडक

शनिवारी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून भरस्त्यात नवीनकुमारने विमलच्या गळ्यावर ब्लेडने हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हा प्रकार तेथून जाणार्‍या संतोष मंडल या तरुणाच्या लक्षात येताच त्याने आंबोली पोलिसांना ही माहिती दिली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या विमलला पोलिसांनी तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी संतोष मंडल याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नवीनकुमारविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.

Jogeshwari Blade Attack
Agriculture Admission 2026: कृषी अभ्यासक्रमाची पहिली फेरी जाहीर; १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या नवीनकुमारला रविारी सकाळी आंबोली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांमध्ये कुठल्या विषयावर वाद झाला होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news