JJ Hospital Resident Doctors: जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे बेमुदत उपोषण; आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता

पगार, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांबाबत नाराजी; २०० डॉक्टर पहिल्या टप्प्यात आंदोलनात सहभागी
JJ Hospital Mumbai
JJ Hospital Mumbaipudhari photo
Published on
Updated on

मुंबई : जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, वेळेवर पगार न मिळणे, सुरक्षा व्यवस्था अपुरी असणे तसेच कॅन्टीनमधील अन्नाचा निकृष्ट दर्जा यांसारख्या समस्यांवरून डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

JJ Hospital Mumbai
Mumbai Water Tax Hike: मुंबईत पाणीपट्टी वाढ अटळ? महापौरांच्या स्थगितीमुळे आर्थिक पेच

सोमवारपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉलेज जिमखान्याच्या कामकाजात प्रशासनाकडून हस्तक्षेप होत आहे. निवडून आलेल्या संघटनेचे अधिकार कमी केले जात असून निर्णयप्रक्रियेत प्रशासनाचा वाढता प्रभाव दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

JJ Hospital Mumbai
Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेची आज पहिली महासभा

असोसिएशनचे सरचिटणीस ऋषिकेश शिंदे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात सुमारे 200 डॉक्टर आणि निवासी डॉक्टर उपोषणात सहभागी होतील, त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार आहेत.

जिमखान्याच्या सल्लागार समितीचे प्रशासकीय समितीत रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार निवडून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थी प्रतिनिधींकडून प्रशासनाकडे हस्तांतरित झाले आहेत. जिमखान्यासाठी प्रस्तावित सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेललाही निवासी डॉक्टरांनी विरोध केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

JJ Hospital Mumbai
IIT Mumbai AI Research Center: आयआयटी मुंबईत होणार संशोधन केंद्र!

मागण्यांवर तातडीने तोडगा काढा

रुग्णालय प्रशासनाने आमच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news