BMC Election : मुंबईत आघाडीसाठी जयंत पाटील मातोश्रीवर

काही जागांवर तडजोड करण्याची राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ठाकरेंकडे मागणी
BMC Election
मुंबई : शरद पवार गटाला वॉर्ड क्रमांक 111 आणि 119 या जागा हव्या आहेत. तेथे शरद पवार गटाचे अनुक्रमे धनंजय पिसाळ आणि मनीषा रहाटे हे उमेदवार विजयी झाले होते. मात्र 119ची जागा ठाकरे गटाने मनसेला देण्याची कबूल केले आहे. हा निर्णय बदलावा अशी मागणी जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर ‌‘मातोश्री‌’बाहेर पत्रकारांनी जयंत पाटील यांना गराडा घातला, त्यावेळी चर्चेतील काही तपशील जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितला.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे मनसेसोबत जुळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी वांद्रे येथे मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व मुंबईत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा केली.

उद्धव भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले, उमेदवारी अर्ज सादर करण्यास केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुद्दामहून आलो होतो. बरीच चर्चा झाली. पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. आम्ही महाविकास आघाडीतील घटक आहोत. त्यामुळे मुंबईत शिवसेनेशी आघाडी व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे.

BMC Election
PMC PCMC elections : अजित पवारांचे घड्याळ शरद पवार बांधणार?

काँग्रेस, शिवसेना (उबाठा ) अशी महाविकास आघाडी मुंबईत एकत्र यावी, अशी आमची धारणा होती. आमच्या पक्षाची मुंबई शहरात काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या पक्षांएवढी ताकद नाही. त्यामुळे मागील निवडणुकीत आम्ही विजयी झालेल्या जागा आम्हाला सुटाव्यात अशी आमची मागणी आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

BMC Election
BMC Elections 2026: मराठी कौल कुणाला? मुंबईतील ‘हे’ 10 प्रभाग ठरवणार महापालिकेत कोणाची सत्ता येणार?

विक्रोळी-भांडुपचा तिढा

ठाकरे बंधू व शरद पवार गटात विक्रोळी - भांडुप परिसरातील जागांवरून पेच निर्माण झाला आहे. येथील दोन वॉर्डांवरून युतीची चर्चा रखडली आहे. त्यामुळे जयंत पाटील व उद्धव ठाकरे यांच्यातील बैठकीत या मुद्द्यावर तोडगा निघाला नसल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news