

BMC Elections 2026 Sena vs Sena Marathi Wards: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, यावेळी राजकारणात एक ऐतिहासिक घटना पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र आले आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मराठी माणसांच्या मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप महायुती त्यांचा सामना करण्यासाठी मैदानात उतरली आहे. त्यामुळे यंदाची लढत ही थेट सेना विरुद्ध सेना अशी असणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील काही मोजके मराठीबहुल प्रभाग या निवडणुकीचा कौल ठरवणार आहेत.
हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला हा प्रभाग प्रतिष्ठेचा मानला जातो. ठाकरे गटाकडे अनुभवी नेते आहेत, तर शिंदे गटानेही काही माजी नगरसेवक फोडले आहेत.
शिवसेनेचा जन्म झालेला दादर परिसर आजही मराठी राजकारणाचं केंद्र आहे. शिवाजी पार्क परिसरात ठाकरे बंधूंची युती भावनिक मुद्दा ठरू शकते. शिंदे गट मात्र पुनर्विकास आणि सुविधा यावर भर देणार आहे.
एकेकाळचा गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा हा भाग अजूनही मराठी मतदारांचा गड आहे. इथे ठाकरे गटाची भावनिक पकड आहे, तर सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडे प्रशासकीय ताकद आहे.
हा मोठा उपनगर प्रभाग असून शिवसेनेचा किल्ला मानला जातो. इथं खरे शिवसैनिक कोणासोबत आहेत, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
मुंबईच्या उत्तर टोकाला असलेला दहिसर प्रभाग अत्यंत निर्णायक मानला जातो. इथे मराठी मतांसोबत इतर समाजांचंही गणित महत्त्वाचं आहे. शिंदे गटाने अलीकडे केलेली विकासकामं निर्णायक ठरू शकतात.
मुंबईत एकूण 227 प्रभाग आहेत. पण मराठी मतदार जिथे मोठ्या प्रमाणात आहेत, अशा काही प्रभागांमध्ये जो पक्ष आघाडी घेईल, तोच सत्तेच्या जवळ जाईल. ठाकरे बंधूंची युती मराठी भावनांना हात घालते, तर शिंदे-भाजप युती सत्तेचा आणि विकासाचा मुद्दा मांडणार आहे.
यामुळे यंदाची BMC निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, ‘खरी शिवसेना कोणाची?’ आणि मुंबईवर कोणाचा भगवा फडकणार?’ ही ठरवणारी निवडणूक आहे.