PMC PCMC elections : अजित पवारांचे घड्याळ शरद पवार बांधणार?

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींत नवा वाद
PMC PCMC elections
अजित पवारांचे घड्याळ शरद पवार बांधणार?(Pudhari News Network)
Published on
Updated on

मुंबई : पुणे आणि पिंपरी- चिंचवड या महानगरपालिकांची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असतील तर सर्व उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभे राहावेत, अशी आग्रही भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याने वाद उभा राहिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे तुतारी चिन्हाचा आग्रह धरून आहेत.

राष्ट्रवादी अखंड असताना पुणे आणि पिंपरी- चिंचवड या महानगरपालिकांच्या निवडणुकांची सूत्रे अजित पवार यांच्याकडे होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणचे राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक अजित पवार समर्थक होते. पक्षफुटीनंतरही त्यांनी साथ सोडली नाही.

PMC PCMC elections
Municipal Corporation Election : मुंबई, ठाण्यात ‘महायुती’चे ठरले; दोन दिवसांत घोषणा

सध्या घड्याळ हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून अजित पवार यांच्या पक्षाकडे देण्यात आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी या एकमेव मतदार संघात बापूसाहेब पठारे हे आमदार आहेत. शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदार संघाचा काही भाग पिंपरी - चिंचवडमध्ये येतो.

या दोन मतदार संघांशिवाय शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी फुंकणारा माणूस हे निवडणूक चिन्ह पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात फार पोहोचलेले नाही, याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून घड्याळ चिन्ह मतदारांना माहीत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या 36 पैकी 34 तर पुण्यातील 41 पैकी 5 ते 6 वगळता उर्वरित नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह अजित पवार गटाने धरला आहे. त्यास खा. सुप्रिया सुळे यांनी विरोध केल्यामुळे घड्याळ की तुतारी यावरून दोघांत वाद सुरू असल्याचे समजते.

PMC PCMC elections
CM Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळवायची आहेत
  • पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, कल्याण - डोंबिवली आदी ठिकाणी एकत्र आघाडी करण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटात सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकाच घड्याळ चिन्हावर लढल्यास हे एक प्रकारे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची नांदी ठरेल आणि शरद पवार गटाने एक प्रकारे अजित पवारांचे नेतृत्व मान्य केल्यासारखे होईल. शरद पवार गट त्यास तयार होईल का याकडे राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news