Jayant Patil|"मुख्यमंत्र्यांसोबतची भेट पूर्वनियोजित; पटेल, तटकरे सोबत नव्हते" : 'वर्षा'वरील बैठकीबाबत जयंत पाटील काय म्हणाले?

प्रशासकीय कामकाजासंदर्भात भेट घेतल्‍याचा केला दावा

Jayant Patil meets Devendra Fadnavis
Jayant Patil meets Devendra FadnavisPudhari
Published on
Updated on

Jayant Patil meets Devendra Fadnavis

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भेट घेतल्‍योन राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकाच वेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय फेरबदलांच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पडदा टाकला असून, ही भेट निव्वळ पूर्वनियोजित आणि प्रशासकीय कामासाठी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जयंत पाटील यांच्‍यासह तटकरे, पटेल वर्षा बंगल्‍यावर दाखल

काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. अजित पवार यांच्या पक्षातील दोन वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अचानक दाखल झाले. मात्र, याच दरम्यान शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्रिमंडळ फेरबदलांची चर्चा आणि दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए (NDA) सोबत जाणार का? अशा चर्चा सुरू असतानाच या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते.


Jayant Patil meets Devendra Fadnavis
Jayant Patil meets Devendra Fadnavis: जयंत पाटील मध्यरात्री ‘वर्षा’वर; राजकीय चर्चांना उधाण

प्रफुल्ल पटेल-तटकरेंसोबत भेट नाही: जयंत पाटील

या सर्व चर्चांवर 'पुढारी न्यूज'शी बोलताना जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांसोबतची माझी भेट ही पूर्णपणे पूर्वनियोजित होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माझी कोणतीही संयुक्त भेट झालेली नाही, ना त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली आहे. आम्ही एकमेकांना तिथे भेटलो हा निव्वळ एक योगायोग होता."


Jayant Patil meets Devendra Fadnavis
Political News | शरद पवारांची राष्‍ट्रवादी ‘एनडीए’सोबत? विनोद तावडे-जयंत पाटील गुप्‍त भेटीत सत्तेतील सहभागावर खल

भेटीचे मूळ कारण काय?

आपल्या भेटीचे कारण स्पष्ट करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, माझ्‍या मतदारसंघातील ईश्वरपुरचे नगराध्यक्ष ७००० मताने निवडून आले आहेत. त्‍यांच्‍या मामाने २२ वर्षांपूर्वी एका जागेत बांधकाम केले होते. ती जागा नगराध्यक्ष यांनी बक्षीसी प्रमाणे घेतली त्यावर अद्याप कोणती नोटीस आली नाही तरी जिल्हाधिकाऱ्यानी त्याना नोटीस देत अपात्र ठरवले आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भेटण्‍यास सांगितले होते. रात्री उशीरा बोलवले. मी हॉल मध्ये बसलो होतो आणि मुख्यमंत्री बऱ्याच वेळानंतर आले. मी त्‍यांना ईश्‍वरपूरमधील नगराध्‍यक्षांच्‍या कारवाईबाबत त्‍यांना माहिती दिली. या प्रश्‍नी माहिती घेऊन सांगतो असे मला म्हणाले."


Jayant Patil meets Devendra Fadnavis
Sunil Tatkare on ncp conflict | "मी नाराज नाही, माझी कोणावर नाराजी नाही" : सुनील तटकरेंची स्‍पष्‍टोक्‍ती

मुख्‍यमंत्री कोणाशी भेटले हे माहिती नाही

वर्षा बंगल्‍यावर माझी प्रफुल्‍ल पटेल आणि तटकरे यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही. चहा घेतला आणि बऱ्याच वेळा नंतर बाहेर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर आले. मुख्‍यमंत्री कोणाशी भेटले मला माहिती नाही. मुख्‍यमंत्री येईपर्यंत मी फुटबॉल सामना पाहत होतो. तेव्‍हा अनेकांचा मेसेज आला की अशी चर्चा सुरु झाली आहे.


Jayant Patil meets Devendra Fadnavis
Maharashtra politics : ‘शरद पवार-एकनाथ शिंदे यांची भेट राजकीय..’, सुप्रिया सुळे यांचा मोठा खुलासा

राष्‍ट्रवादी विलीनकरणावर कोणतीही चर्चा नाही

राष्‍ट्रवादी विलीनीकरणावर चर्चाच झालेली नाही. अजित पवार यांच्‍या अपघाती निधनानंतर कधीच चर्चा झाली नाही. चर्चा थांबली असे म्‍हणता येणार नाही कारण चर्चाच सुरु झालेली नाही. विनोद तावडे यांच्या सोबत बैठक झाली.एका कार्यक्रमात गेल्यावर ते तिथे होते त्यांच्या सोबत कॉफी घेतली, असेही जयंत पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. आम्ही राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्या मागे आहोत.वारंवार अशा चर्चा का येतायत याचा दुःख होते, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news