Street vendors protest : फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा!

जनवादी हॉकर्स सभेचे आझाद मैदानात आंदोलन
street vendors protest
मुंबई : मुंबईत फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई थांबवून पदपथ विक्री कायदा अमलात आणण्याच्या मागणीसाठी जनवादी हॉकर्स सभेने बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबवून दिलेल्या मसुद्यानुसार पदपथ विक्री कायदा अंमलात आणा अशी मागणी जनवादी हॉकर्स सभेने बुधवारी केली.

मुंबईतील फेरीवाले महापालिकेच्या कारवाई विरोधात बुधवारी आझाद मैदानात धडकले. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कारवाई विरोधात संताप व्यक्त करीत महापालिका प्रशासनाविरोधत घोषणाबाजी केली.सिटूच्या जनवादी हॉकर्स सभेचे अध्यक्ष के.नारायणन व जनरल सेक्रेटरी रविंद्र मदने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात कार्याध्यक्ष शैलेंद्र कांबळे, सेक्रेटरी जमुना प्रसाद गुप्ता, चंद्रकांत बोजगर यांच्यासह मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा सहभाग घेतला.

street vendors protest
Uday Samant : पनवेल झोपडपट्टीमुक्तीसाठी सिडकोचीच जमीन

फेरीवाला कायदा अर्थात पदपथ विक्री कायदा अंमलात आणा, कायद्याच्या कलम 3.3 अंतर्गत संरक्षित व पीएम स्वनिधी कर्जधारक फेरीवाल्यांवरील कारवाई त्वरित थांबवा, दर पाच वर्षांनी करावयाचा सर्व्हे पुन्हा करा आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी रविंद्र मदने म्हणाले, फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाला महापालिका प्रशासनाने चर्चेसाठी बोलवित होते. प्रशासनाबरोबर चर्चा झाली. मुंबईतील फेरीवाल्यांच्या ज्या मागण्या असतील त्याची अंमलबजावणी करू, असे प्रशासनाने आश्वासन दिले.

street vendors protest
Las Kalyanachi vaccination awareness : लस कल्याणाची मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news