Las Kalyanachi vaccination awareness : लस कल्याणाची मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Las Kalyanachi vaccination : बेतुरकर पाड्यात लसीकरण जनजागृतीसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन
Las Kalyanachi vaccination awareness
लस कल्याणाची मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादpudhari photo
Published on
Updated on

सापाड : योगेश गोडे

बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लसीकरणाबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या "लस कल्याणाची" या लोकसहभागावर आधारित उपक्रमांतर्गत कल्याण पश्चिम येथील बेतुरकर पाडा भगवान नगर, सिद्धिविनायक साळीत विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. शेड एम क्यू एनजीओ यांच्या पुढाकाराने आणि पुढारी न्यूजच्या सहकायनि आयोजित या कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत लसीकरणाबाचतची माहिती जाणून घेतली. दुपारच्या सत्रामध्ये परिसरातील एकूण ३२ नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

बालकांचे नियमित लसीकरण, लसींबाबत पसरलेल्या गैरसमजुती दूर करून पालक आणि समाजामध्ये लसीकरणाबद्दल विश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यासोबतच नागरिकांना "लस कल्याणाची" व्हॉट्सअॅप चंनिलशी जोडून त्यांना लसीकरण आणि बालआरोग्याशी संबंधित अचूक माहिती सातत्याने मिळावी, यासाठीही लस काल्याणची मोहिमेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शोभा यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. त्यांनी लसीकरणाचे समाजातील महत्व पटवून देत बालकांना वेळेवर लस दिल्यास अनेक गंभीर आजारांपासून त्यांचे संरक्षण होते, असे सांगितले, पालकांनी लसीकरणाच्या वेळापत्रकाबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले, तर, संघटनेचे स्थानिक मतपरिवर्तन प्रतिनिधी दर्शन आणि योगिनी बांनी सहभागी नागरिकांशी संवाद साधला, त्यांनी "लस कल्याणाची" उपक्रमाबद्दल माहिती देत लसीकरणाशी संबंधित निविध महत्वाच्या बाची समजवून सांगितल्या.

Las Kalyanachi vaccination awareness
Coastal Road project : कोस्टल रोडच्या वाढीव खर्चाला विरोध

लस कल्याणाची चर्चा सत्र अजून प्रभावी करण्यासाठी मिथक विरुद्ध वास्तव, प्रश्नोत्तर सत्र, तसेच किडासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या संवादात्मक उपक्रमामुळे नागरिकांच्या मनातील अनेक शंका दूर होऊन लसीकरणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला. दर्शन यांनी आपल्या अनुभवाविषयी सांगताना अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले.

"लस कल्याणाची" जोडल्यापासून लसीकरणाबाबत अधिक सस्खोल माहिती मिळत असल्याचे त्यांनी केले. या माहितीच्या आधारे त्या आपल्या परिसरातील कुटुंबांना योग्य मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.बालकांना वेळेवर लस देणे का आवश्यक आहे, याचाबत त्यांनी पालकांना समजावून सांगितले आणि प्रत्येकाने आपल्या ओळखीच्या कुटुंबांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन देखील केले. वर्शन यांनी सहभागीसोबत छोटेखानी प्रश्नोतर सत्र घेतले, ज्यामध्ये अनेकांनी उत्साहाने सहभाग घेत योग्य उत्तरे दिली. यावरून नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जागरूकता वाढत असल्याचे दिसून आले.

योगिनी यांनीही आपले अनुभव सांगताना "लस कल्याणाची" समूहाशी जोडल्यापासून त्या सातत्याने परिसरातील कुटुंघांना व्हॉट्सअॅप चॅनलशी जोडण्यासाठी प्रेरित करत असल्याचे सांगितले. विशेषतः लहान मुलांचे पालक लसीकरणाच्या वेळापत्रकाबाबत जागरूक राहावेत, यासाठी त्या नियमित जनजागृती करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे समन्वयन झेड एम क्यू च्या पथकातील रहीम, शोभा, ज्योती आणि नगमा यांनी केले. सत्रादरम्यान त्यांनी नागरिकांना "लस कल्याणाची" व्हॉट्सअॅप पॅनलमध्ये कसे सहभागी व्हायचे, याचे मार्गदर्शन केले. या माध्यमातून लसीकरणाशी संबंधित महत्वाची माहिती नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या सत्राला कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या महालक्ष्मी फुले अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटरच्या आरोग्य विभागातील कर्मचायांचीही उपस्थिती लाभली. यामध्ये एएन एम सिस्टर माया ढांडे, आशा सेविका रेखा, अमृता कदम, गीता कदम आणि बाची राठोड, तसेच अंगणवाडी सेविका आणि शिक्षक यांनीही सहभाग घेतला, सिस्टर माया कांडे यांनी नागरिकांना संबोधित करताना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी मार्गदर्शन केले. कारण लसी अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांपासून बालकांचे संरक्षण करतात, पालकांनी लसीकरणाचे वेळापत्रक पाळणे आणि लसीकरणाबाबत अचूक माहिती मिळवणासाठी "लस कल्याणाची" समूहाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

Las Kalyanachi vaccination awareness
Mumbai accident : विक्रोळी-गोरेगावातील दोन अपघातांत तिघांचा मृत्यू, एक गंभीर

संवादात्मक चर्चेदरम्यान नागरिकांनी लप्सीकरणाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले. एका मातेने बीसीजी लस कोणत्या आजारापासून संरक्षण करते? असा प्रश्न विचारला. यावर सिस्टर माया यांनी बीसीजी लस क्षयरोगापासून (टीबी) संरक्षण देते, असे स्पष्ट केले.

दुसऱ्या एका महिलेने गर्भधारणेदरम्यान दिल्या जाणाऱ्या पहिल्या इंजेक्शनबाबत प्रश्न विचारला. त्यावर सिस्टर माया यांनी गर्भवती महिलांना टिटनसची लस दिली जाते, जी आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, असे सांगितले. या चर्चेमुळे उपस्थित महिलांना गर्भावस्थेतील लसीकरणाबाबतही महत्त्वाची माहिती मिळाली.

सत्रादरम्यान लसीकरणाबाबत पसरलेल्या काही गैरसमजुतींवरही चर्चा करण्यात आली. काही लोकांमध्ये लसीमुळे दुष्परिणाम होतात किवा मुलांना आजार होतो, अशी चुकीची समजूत असल्याचे निदर्शनास आले. यावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की, लसी सुरक्षित असून त्या वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहेत आणि मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास अत्यावश्यक आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे "पाँच साल, सात बार छूटे ना टीका एक भी बार" ही गगनभेदी घोषणा देत परिसराचे लक्ष केंद्रित केले. या घोषणेमुळे बालकांना जन्मापासून पाच वर्षापर्यंत दिल्या जाणाऱ्या सर्व लसी पूर्ण करणे किती आवश्यक आहे, याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी सहभागी नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात आली. तसेच शेड एम क्यू एनजीओ संस्थेच्या वतीने छोट्या भेटवस्तू देऊन उपस्थितांना गौरवण्यात आले.

पालकांमध्ये जागरूकता वाढली...

या सामूहिक बैठकीत परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संवादात्मक पद्धतीने झालेल्या चर्चेमुळे लसीकरणा-विषयीचे गैरसमज दर होण्यास मदत झाली असून पालकांमध्ये जागरूकता वाढल्याचे दिसून आले. लस कल्याणाची या उपक्रमामुळे समाजातील विविध घटक एकत्र येऊन बालकांच्या आरोग्यासाठी कार्यरत असल्याचे चित्र या जनजागृती मोहिमेतून स्पष्ट झाले. स्थानिक आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक आणि नागरिक यांच्या सहभागामुळे या मोहिमा अधिक यशस्वी होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचवून एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य हेतू असून अशा उपक्रमांमुळे भविष्यात आरोग्यदायी समाज घडण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news