CM Devendra Fadnavis :आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करा

Indu Mill Ambedkar Memorial : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; एमएमआरडीएकडून कामाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवावे
Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavispudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करून हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करावे. त्यासाठी कंत्राटदाराने सुधारित कामाची कालमर्यादा निश्चित करून उच्चाधिकार समितीकडे तसा अहवाल सादर करावा. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामाच्या प्रगतीवर दररोज नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती, स्ट्रक्चरल स्टीलचे फॅब्रिकेशन, ब्रॉन्झ क्लॅडिंग, बांधकामाची गुणवत्ता, कंत्राटदाराच्या अतिरिक्त आर्थिक मागण्या आणि काम पूर्ण करण्याच्या कालमर्यादेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Devendra Fadnavis
Pratap Sarnaik : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख रिक्षांचे वाटप करणार

कंत्राटातील तरतुदी, जीएसटी दरातील बदल, दरवाढ निर्देशांक आणि अतिरिक्त कामांमुळे निर्माण झालेल्या खर्चाची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करावी. जीएसटी दरातील बदलाबाबत कंत्राटातील तरतुदींनुसार कायदेशीर अभिप्राय घ्यावा. ब्रॉन्झ क्लॅडिंगसाठी आवश्यक साहित्य खरेदी करता यावे, यासाठी बँक हमीच्या आधारे आगाऊ रक्कम देण्याच्या प्रस्तावाची तपासणी करावी. सर्व आर्थिक प्रस्ताव एकत्रितपणे समितीसमोर ठेवून नियमानुसार निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कामे समांतरपणे पूर्ण करा

स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी आणि ब्रॉन्झ क्लॅडिंगची कामे एकमेकांशी समन्वय साधून समांतरपणे पूर्ण करावीत. आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, फॅब्रिकेशन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांचा समावेश असलेले सुधारित वेळापत्रक सादर करावे. प्रत्येक टप्प्याची जबाबदारी आणि कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार नियमित आढावा घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले.

Devendra Fadnavis
CM Pramod Sawant | गोवेकरांना फक्त 5 हजारांत मिळणार सरकारी फ्लॅट; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा

स्मारकाच्या संरचनात्मक रचनेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित एजन्सीची जबाबदारी कायम ठेवून कामाची गती वाढवावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा महत्त्वाचा सार्वजनिक प्रकल्प असल्याने त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

  • स्मारकाचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटातील अटी व शर्तीचे पालन करून काम पूर्ण करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. आर्थिक मागण्यांमुळे काम थांबविणे योग्य नसून, कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.

  • संबंधित एजन्सीची काम पूर्ण करण्याची क्षमता आणि बांधिलकी तपासून आवश्यकतेनुसार पर्यायी एजन्सी नियुक्त करण्यासह कठोर कारवाईच्या पर्यायांचाही विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.