Pratap Sarnaik : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख रिक्षांचे वाटप करणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
Pratap Sarnaik
Pratap SarnaikPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनेंतर्गत पाच वर्षांत १ लाख रिक्षांचे वाटप करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळणार आहे.

निसर्गाची अनियमितता, सततची दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना आता उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पुढील पाच वर्षांत अनाथांचा नाथ या योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनेंतर्गत तब्बल १ लाख प्रवासी ऑटोरिक्षांचे वाटप करण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

Pratap Sarnaik
Jayakwadi Dam water protest: पाण्यासाठी ४६ गावांचा एल्गार; बैलगाड्यांसह गावकऱ्यांचा खरवंडीत महामार्गावर चक्काजाम

पुढील वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२७ रोजी पात्र शेतकऱ्यांना रिक्षाची चावी देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळामार्फत 'अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना' राबविण्यात येणार असून, या योजनेचा लाभ दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे रिक्षा खरेदीसाठी लाभार्थ्यांना वाहनांच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम कल्याणकारी मंडळाच्या वतीने अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असून, उर्वरित ९० टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँका, अनुसूचित बँका किंवा अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जस्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी कुटुंबांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

Pratap Sarnaik
Latur News : वर्षभराच्या मेहनतीचे डोळ्यादेखत होतेय सरपण

पहिल्या वर्षी २० हजार शेतकऱ्यांना लाभ या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या ३१० किंवा भविष्यात वाढणाऱ्या तालुक्यांमधील एकूण २० हजार पात्र शेतकरी लाभार्थ्यांना रिक्षांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी ६० लाभार्थ्यांना रिक्षा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित उद्दिष्टापेक्षा कमी असल्यास उर्वरित रिक्षांचे वाटप त्याच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.