Global Market: अमेरिकन निर्यात मंदावली, युरोपातील व्यापारात मोठी वाढ

जागतिक व्यापार अस्थिर असतानाही निर्यातीत वाढ राखण्यात भारताला यश
Global Market
Global MarketPudhari
Published on
Updated on

मुंबई: पश्चिम आशियातील युद्ध, कच्च्‌‍या तेलाचे वाढलेले भाव, अमेरिकेचे व्यापारी धोरण, यामुळे जागतिक व्यापार अस्थिर असतानाही भारताने इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, रसायने, प्लास्टिक, रबर, मत्स्योत्पादने, अशा विविध क्षेत्रांत एप्रिल महिन्यात बहुतांश क्षेत्रांत निर्यातवाढ नोंदवली आहे. प्रमुख निर्यात बाजारपेठ असलेल्या अमेरिकेने नाकारले असले, तरी युरोप आणि चीनसह आशियाई देशात निर्यातवाढ झाली आहे.

आर्थिक वर्षातील (2026-27) पहिला महिना असलेल्या एप्रिलमध्ये भारताची व्यापारी मालाची निर्यात 14 टक्क्यांनी वाढून 43.6 अब्ज डॉलरवर गेली आहे. तेलाची निर्यात 35 टक्क्यांनी वाढून 9.6 अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या दोन वर्षांतील निर्यातीचा हा उच्चांक आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात तब्बल 40 टक्क्यांनी वाढून 5.2 अब्ज डॉलरवर गेली आहे.

Global Market
School Relocation Policy: पटसंख्येच्या निकषावर शाळांचे स्थलांतर नको!

उद्योगांना आवश्यक यंत्रसामग््राी, इंजिन, स्टील आणि धातूच्या वस्तू यांसारख्या अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 8.8 आणि रसायनांची निर्यात 7.2 टक्क्यांनी वाढली आहे. मत्स्योत्पादने, खनिजे, प्लास्टिक आणि रबरची निर्यातही वाढल्याचे आयसीआयसीआय बँकेच्या ग्लोबल मार्केट्‌‍सच्या अहवालात म्हटले आहे. सिरॅमिक्स, ग्लासवेअरची निर्यात 41 टक्क्यांनी घटली असून, दागिन्यांसह मौल्यवान खडे, कपडे आणि कृषी उत्पादनांची निर्यात घटल्याचे अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेला होणारी निर्यात अवघ्या 1.1 टक्क्याने वाढून 8.5 अब्ज डॉलरवर आली आहे. मात्र, चीनसह हाँगकाँग, सिंगापूर, बिटन आणि जर्मनीची आयात 17 टक्क्यांनी वाढून 35 अब्ज डॉलरवर गेली आहे. सिंगापूरला होणारी निर्यात 179.18 टक्क्यांनी वाढून 3.19 अब्ज डॉलरवर गेली आगे.

टाझांनियाला होणारी निर्यात दीडशे टक्क्यांनी वाढून 1.29 अब्ज डॉलर आणि श्रीलंकेला होणारी निर्यात दुपटीने वाढून 1.02 अब्ज डॉलरवर गेली आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे या प्रदेशात होणारी निर्यात 28 टक्क्यांनी घटली आहे. आशियाई आणि युरोपातील निर्यातवाढीने हे नुकसान बऱ्याच प्रमाणात भरून निघाले.

चालू खात्यातील तूट वाढणार

पश्चिम आशियातील संघर्ष कायम असल्याने आणि जागतिक तेलाचे दर सरासरी 100 डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने भारताची चालू खात्यातील तूट या वर्षी लक्षणीयरीत्या वाढू शकते, असा इशारा आयसीआयसीआय बँकेच्या ‌’ग्लोबल मार्केट्‌‍स‌’ विभागाने दिला आहे.

Global Market
Maharashtra FYJC Admission: अकरावी प्रवेश संकेतस्थळावर जुनीच माहिती; विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

सेवा क्षेत्रातील निर्यातीची भक्कम कामगिरी काही प्रमाणात दिलासा देणारी असली, तरीही अनावश्यक आयातीवर नियंत्रण ठेवल्यास आणि जागतिक जोखीमविषयक वातावरण स्थिर झाल्यानंतर भांडवली ओघ सुधारल्यास चालू खात्यातील तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 1.5 ते 2 टक्के यादरम्यान स्थिरावेल, असा अंदाज या बोकरेज संस्थेने वर्तविला आहे.

विदेशी गुंतवणूक वाढेल

आर्थिक वर्ष 2027 मध्ये आत्तापर्यंत विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफपीआय) 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक काढून घेतल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत सुधारणा झाल्यावर गुंतवणुकीचा ओघ परत येईल. यादरम्यान अनुपालन आणि बाजारविषयक नियमांमध्ये शिथिलता आणल्यास गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत होऊ शकते, असे आयसीआयसीआयच्या अहवालात म्हटले आहे.

आयात वाढली

आयात 10 टक्क्यांनी वाढून 71.9 अब्ज डॉलरवर गेली आहे. सोन्याची आयात 82 टक्क्यांनी वाढून 5.6 अब्ज डॉलरवर गेली आहे. तर, तेल आणि सोने वगळून इतर वस्तूंची आयात 15 टक्क्यांनी वाढून 47.7 अब्ज डॉलरवर गेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि यंत्रसामग्रीची आयात उच्चांकी 27 टक्क्यांनी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news