War Impact: बांधकाम क्षेत्राला युद्धाची झळ; जानेवारी-मार्चच्या तिमाहीत नवीन बांधकामात 36 टक्क्यांची घट

गत चार तिमाहीतील ही सर्वांत मोठी घसरण आहे. मात्र, मार्च 2025 च्या तिमाहीच्या तुलनेत नवीन बांधकाम क्षेत्र दोन टक्क्यांनी वाढले आहे.
War Impact
War Impact(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मुंबई: भूराजकीय संघर्ष, अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे दिल्ली, पुणे, मुंबईसह सात महानगरांमधील बांधकाम क्षेत्राला झळ बसली आहे. जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीतील डिसेंबर 2025च्या तिमाहीच्या तुलनेत नवीन बांधकाम 36 टक्क्यांनी घटून 97 लाख चौरस फुटांवर आले आहे. गत चार तिमाहीतील ही सर्वांत मोठी घसरण आहे. मात्र, मार्च 2025 च्या तिमाहीच्या तुलनेत नवीन बांधकाम क्षेत्र दोन टक्क्यांनी वाढले आहे.

युद्धामुळे इंधनाच्या भावात झालेली वाढ आणि विस्कळीत झालेला व्यापार, यामुळे गुंतवणूकदारांची आणि खरेदीदारांची मानसिकता काही प्रमाणात प्रभावी झाल्याचे दिसून येत आहे. बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, पुणे, नवी दिल्ली या सात शहरांत मिळून बेंगळुरूमध्ये सर्वाधिक 42 लाख चौरस फूट नवीन बांधकामाची नोंद झाली.

War Impact
Tushar Doshi Transferred: तुषार दोशी यांची बदली; सातारची झेडपी झटापट नडली

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीच्या तुलनेत त्यात 20 टक्क्यांनी वाढ झाली असून, जानेवारी ते मार्च 2025च्या तुलनेत 13 टक्क्यांनी घट झाली आहे. चेन्नईतील नवीन बांधकाम क्षेत्र गत वर्षातील तिमाहीच्या तुलनेत 1,400 टक्क्यांनी वाढून 15 लाख चौरस फुटांवर गेले असून, ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत 67 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती वेस्टियन या बाजार विश्लेषक संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे.

मुंबईतील नवीन बांधकाम क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत 300 टक्क्यांनी वाढून 12 लाख चौरस फुटांवर गेले असून, डिसेंबरमधील तिमाहीच्या तुलनेत 29 टक्क्यांनी घटले आहे. पुण्यातील बांधकाम क्षेत्र वार्षिक 62 टक्क्यांनी घटून 11 लाख चौरस फुटांवर आले आहे.

War Impact
Farmers Loan Waiver| शेतकऱ्यांना जूनअखेर कर्जमाफी: कृषी मंत्री भरणे

डिसेंबर 2025च्या तुलनेत बांधकाम क्षेत्र 10 टक्क्यांनी वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत नवी दिल्लीतील नवीन बांधकाम क्षेत्र 46 टक्क्यांनी घटून 14 लाख चौरस फुटांवर आले आहे, तर डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तिमाही विक्री 2.15 कोटी चौरस फुटांवर

देशातील सात महानगरांमध्ये जानेवारी ते मार्च 2025 च्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत बांधकामाची विक्री 20 टक्क्यांनी वाढून 2.15 कोटी चौरस फुटांवर गेली आहे. तर, ऑक्टोबर ते डिसेंबर 2025च्या तुलनेत त्यात एक टक्क्याने घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत मुंबईतील विक्री सात टक्क्यांनी घटून 37 लाख चौरस फुटांवर गेली आहे. तर, पुण्यातील विक्री 47 टक्क्यांनी वाढून 39 लाख चौरस फुटांवर गेली आहे. बेंगळुरूमधील विक्री 20 टक्क्यांनी वाढून 49 लाख चौरस फुटांवर गेली असून, दिल्लीतील बांधकाम क्षेत्र 12 टक्क्यांनी वाढून 30 लाख चौरस फुटांवर गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news