

मुंबई : मानवी मेंदू हा शरीरातील सर्वांत गुंतागुंतीचा अवयव असून त्याच्या आजारांचे नेमके कारण शोधणे हे आजही संशोधकांसमोरचे मोठे आव्हान आहे. अल्झायमर, पार्किन्सन्स, ग्लायोमा यांसारख्या मेंदूविकारांमध्ये जनुके, प्रथिने, जैवचिन्हके आणि औषधांशी संबंधित प्रचंड माहिती उपलब्ध असली, तरी ती विविध संशोधन अहवाल, डेटाबेस आणि शोधनिबंधांमध्ये विखुरलेली आहे. हीच अडचण दूर करण्यासाठी आयआयटी मुंबईने ‘ब्रेनप्रॉट 3.0’ आणि ‘ड्रगप्रॉटएआय’ हे दोन महत्त्वाचे डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत.
ब्रेनप्रॉट हा मानवी मेंदूशी संबंधित विविध पातळ्यांवरील माहिती एका व्यासपीठावर आणणारा प्लॅटफॉर्म आहे. निरोगी आणि आजारग्रस्त मेंदूमधील बदल, जनुकांची अभिव्यक्ती, प्रथिनांची पातळी आणि जैवचिन्हकांमधील फरक यांचा सखोल अभ्यास या माध्यमातून करता येणार आहे. आयआयटी मुंबईतील प्रा. संजीव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. अंकित हालदार यांच्यासह संशोधकांच्या चमूने विकसित केलेले हे दोन्ही प्लॅटफॉर्म मेंदूविकार संशोधनात भारताला जागतिक पातळीवर नेणारे ठरत आहेत.
विशेष म्हणजे मानवी मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागांतील मज्जासंस्थात्मक विभागांमधील प्रथिनांमधील बदल प्रथमच एका व्यासपीठावर स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत. या प्लॅटफॉर्ममध्ये 56 मेंदूविकारांशी संबंधित माहिती, 1 हजार 800 हून अधिक रुग्णनमुन्यांवर आधारित 52 मल्टी-ओमिक्स डेटासेट समाविष्ट आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट आजाराशी संबंधित जनुके किंवा प्रथिने ओळखणे संशोधकांना सोपे जाईल.
याशिवाय ‘ब्रेन डिसीज मार्कर क्युरेटर’ या निर्देशांकाच्या मदतीने हजारो संभाव्य जनुकांमधून उपयुक्त जैवचिन्हके वेगळी काढली जातात. अल्झायमर आणि ग्लायोमासारख्या आजारांमध्ये आधीच ओळखली गेलेली महत्त्वाची प्रथिने या प्रणालीतही उच्च क्रमांकावर आल्याने या प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता अधोरेखित होते. औषधनिर्मितीसाठी विकसित करण्यात आलेले ‘ड्रगप्रॉटएआय’ हे साधन एखादे प्रथिन औषधासाठी योग्य आहे की नाही, याचा अंदाज आधीच देते.
चिन्हक ओळखणे, त्याची अभिव्यक्ती तपासणे, औषधयोग्यता मोजणे आणि उपलब्ध औषधांचा शोध ही संपूर्ण प्रक्रिया एका तासात करता येणार असल्याचे, असे डॉ. अंकित हालदार यांनी सांगितले.
विशेष म्हणजे मानवी मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागांतील वेगवेगळ्या मज्जासंस्थात्मक भागांमधील प्रथिनांमधील बदल प्रथमच एका व्यासपीठावर स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत. या प्लॅटफॉर्ममध्ये 56 मेंदूविकारांशी संबंधित माहिती, 1 हजार 800 हून अधिक रुग्णनमुन्यांवर आधारित 52 मल्टी-ओमिक्स डेटासेट समाविष्ट आहेत. त्यामुळे संशोधकांना एखाद्या विशिष्ट आजाराशी संबंधित महत्त्वाची जनुके किंवा प्रथिने ओळखणे अधिक सोपे होणार आहे. याशिवाय ‘ब्रेन डिसीज मार्कर क्युरेटर’ या निर्देशांकाच्या मदतीने हजारो संभाव्य जनुकांमधून खरोखर उपयुक्त जैवचिन्हके वेगळी काढत संशोधन केले आहे..