HPV Vaccination Maharashtra: राज्यातील मुलींना एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात मोठे पाऊल

जागतिक महिला दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ; 9 ते 14 वयोगटातील सुमारे 9.84 लाख मुलींना लस
HPV Vaccination Maharashtra
HPV Vaccination MaharashtraPudhari
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी 9 ते 14 वयोगटातील सुमारे 9 लाख 84 हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसेच ‌‘पिंक ओपीडी‌’चा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर मुंबई येथे झाला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक आदी उपस्थित होते.

HPV Vaccination Maharashtra
Missing Minor Girls: अल्पवयीन मुली जातात तरी कुठे? हरवलेल्या मुलींच्या वाढत्या घटनांमागील गंभीर प्रश्न

यावेळी शिंदे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, बदललेल्या आहारपद्धतीत आणि वाढत्या तणावामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एचपीव्ही लसीकरण हा त्याच दिशेने टाकलेले मोठे आणि स्तुत्य पाऊल आहे.

HPV Vaccination Maharashtra
Dombivli Lezim World Record: डोंबिवलीत 9,111 महिलांचे सामूहिक लेझीमवादन; जागतिक महिलादिनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

राज्यातील 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देण्याची ही व्यापक मोहीम राबवली जात असून त्यामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालता येईल. जागतिक स्तरावर कर्करोग हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न बनत असताना राज्य सरकार या संदर्भात सक्रिय पावले उचलत आहे. मुख्यमंत्री असताना राबवलेल्या ‌‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित‌’ या उपक्रमाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, त्या मोहिमेत 3 कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास 10 हजार महिलांमध्ये कर्करोगाचे प्रारंभिक निदान झाले. आजार पहिल्या टप्प्यात सापडल्यामुळे अनेक माता-भगिनींचे प्राण वाचवणे शक्य झाले, याचा खरा आनंद आहे.

HPV Vaccination Maharashtra
Devendra Fadnavis : राज्यात इंधन टंचाई नाही

अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मेमोग्राफी तपासणीच्या आठ गाड्यांद्वारे गावागावांत तपासणी सुरू असून आतापर्यंत 2 कोटी 91 लाख महिलांची तपासणी झाली आहे.

गरज भासल्यास आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी डीपीडीसी, जीएसआर तसेच राज्याच्या आरोग्य बजेटमधून निधी उपलब्ध करण्याचा विचार करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसेच ‌‘पिंक ओपीडी‌’चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news