

डोंबिवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातील 9,111 महिलांसह विद्यार्थिनींनी रविवारी एकत्र येऊन सामूहिक लेझीमवादन केले. गिनिज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या नारी शक्तीने डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.
डोंबिवलीचे आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ आणि ‘कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक
लेझीमवादन उपक्रमात रविवारी ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील विस्तीर्ण पटांगणावर विद्यार्थिनी आणि महिलांनी एकत्र येऊन 9 हजार 111 इतक्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीमवादनाचे वर्ल्ड रेकॉर्ड केले.यापूर्वी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता,अशी माहिती गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी यावेळी दिली.