Zika Virus : झिका पार्श्वभुमीवर आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर

पुणे, कोल्हापूर, नगरमधील ३७ हजार ९४९ घरांचे सर्वेक्षण
Zika Virus
झिका पार्श्वभुमीवर आरोग्य विभाग अॅक्शन मोडवरPudhari File Photo

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यामध्ये झिका व्हायरसची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना करत असून यातच पुण्यासह कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्य़ात अळी सर्वेक्षणासाठी ३७ हजार ९४९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात कोल्हापूर मनपा क्षेत्रातील ३४५ , पुणे मनपा हद्दीत ५२९, पार्लरमध्ये ६४, मुळशीमध्ये २३ घरांमध्ये अळ्या सापडल्या आहेत.

राज्यात झिका व्हायरसचे आजपर्यंत २५ रूग्ण आढळले आहेत. यातील पुण्यामध्ये २१ रूग्ण आहेत. कोल्हापूरात १, संगमनेर १ , सासवडमध्ये १ रूग्ण, मुळशीमध्ये १ आहे. झिका हा विषाणूजन्य आजार एडीस डास चावल्यानंतर होतो. हा डास दिवसा चावत असल्याने या डासांना प्रतिबंध करण्यासाठी एकात्मिक किटकव्वस्थापन अंतर्गत उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये १ लाख ५१ हजार ३२० लोकसंख्येचे सर्वेक्षण केले असून त्याअंतर्गत ३७ हजार ९४९ घरे तपासली होती. त्यात कोल्हापूर ६६४१ , अहमदनगर ५७८८, पुणे मनपा २२२९९, पुरंदर २६९७, मुळशी ७२४ घरांचे सर्वेक्षण केले आहे.

Zika Virus
Sangli Zika Virus : सांगलीत 'झिका'चा शिरकाव; वृद्धाला लागण

अळी सर्वेक्षणात अळी आढळलेल्या घरात पाण्याची टाकी, भांडी तपासण्यात आली . यामध्ये १ लाख ११ हजार ३३१ टाकी भांडी तपासली असून त्यातील कोल्हापूरमध्ये ४२८ , अहमदनगर १५, पुणे ७११, पुरंदर ७६, मुळशीमध्ये २३ अळ्या आढळल्या. अळ्या आढळलेली काही भांडी , टाक्या रिकामी केली तर काही टाक्या रिकाम्या करता येत नाहीत त्यात टेमिफोस अळीनाशकाचा वापर करण्यात आला.

Zika Virus
Pune Zika Virus : पुण्याच्या ग्रामीण भागात 'झिका'चा शिरकाव

या पार्श्वभुमीवर कोणालाही ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. तसेच या आजारात रूग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसून मृत्यूचे प्रमाणही नगण्य असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news