Pune Zika Virus : पुण्याच्या ग्रामीण भागात 'झिका'चा शिरकाव

पुणे शहरात झिकाच्या रुग्णांची संख्या 16
Increase in Zika cases in Pune
पुण्यामध्ये झिकाच्या रोगींमध्ये वाढPudhari File photo

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात बुधवारी (दि.10) एका 38 वर्षीय पुरुषाला, तर सासवडमध्ये 65 वर्षीय पुरुषाला झिकाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दोन्ही रुग्णांमध्ये ताप आणि लाल चट्टे अशी लक्षणे दिसली आहेत. त्यामुळे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या 16 झाली असून, ग्रामीण भागातील हा पहिलाच रुग्ण आहे. शहरात पटवर्धन बागेत 38 वर्षीय पुरूषाचा एनआयव्हीमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Increase in Zika cases in Pune
झिका व्हायरसबाबत अलर्ट जारी

सासवडमध्ये 65 वर्षीय पुरुषाला झिकाची बाधा झाली आहे. पोटफुगीचा त्रास होत असल्याने रुग्णाला पुण्यातील खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट केले होते. त्यावेळी ताप आणि लाल चट्टे अशी लक्षणे दिसल्याने रक्तनमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. मंगळवारी नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्ण काही दिवसांपूर्वीच सांगली येथे प्रवास करुन आला होता, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा चव्हाण यांनी दिली. रुग्णाच्या घराच्या आसपासच्या 5 किलोमीटर परिसरामध्ये सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची माहिती राज्य शासनाला कळवली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news