Harshwardhan Sapkal: शरद पवार गटाच्या भूमिकेवर काँग्रेस सावध; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘वेट अँड वॉच’

सुप्रिया सुळेंच्या डिलिमिटेशनवरील भूमिकेनंतर राजकीय चर्चांना वेग; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया
Harshvardhan Sapkal
Harshvardhan SapkalPudhari Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: ‘डिलिमिटेशन’वर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर, या गटाबाबत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत, यावर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. वेट अँड वॉचच्या भूमिकेत काँग्रेस आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

शरद पवार हे राजकारणातून निवृत्ती घेणार? शरद पवार गट केंद्र आणि राज्याच्या सत्तेत सहभागी होणार? असे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र काँग्रेसने या सर्व घडामोडींवर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

Harshvardhan Sapkal
Mumbai Illegal Arms Seizure: मुंबईत बेकायदा शस्त्रांचा साठा जप्त; दोन पिस्तुले आणि १९ जिवंत काडतुसे हस्तगत

‘डिलिमिटेशन’ विधेयकाला काँग्रेस ठामपणे विरोध करणार, अशी या पक्षाची भूमिका आहे. पण इंडिया आघाडीतील शरद पवार गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून अनेक तर्क लावले जात आहेत.

Harshvardhan Sapkal
Kurla Garden Assault Case: कुर्ला मैदान मारहाणप्रकरणी आणखी दोन अल्पवयीन ताब्यात

‘डिलिमिटेशन’ विधेयकाला शरद पवार गटाचे खासदार हे एनडीएला पाठिंबा देतील पण हा पाठिंबा केवळ विधेयकापुरता असेल, असे या गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेस यावर आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.