Kurla Garden Assault Case: कुर्ला मैदान मारहाणप्रकरणी आणखी दोन अल्पवयीन ताब्यात

राज्य मानवाधिकार आयोगाची दखल; पोलीस, पालिका आयुक्तांना नोटीस
Mumbai Kurla viral video
Mumbai Kurla viral videoFile Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: कुर्ला पश्चिम येथील प्रमोद महाजन उद्यानात तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यामुळे या प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांची संख्या आठ झाली आहे.

दोघांना बाल न्याय मंडळासमोर हजर केले असता, त्यांना ४ डिसेंबरपर्यंत बालनिरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, या घटनेची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

Mumbai Kurla viral video
Devendra Fadnavis: शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा नको- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुण आणि त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीला टोळक्याने शिवीगाळ करून हॉकी स्टिक, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. २० नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

याप्रकरणी यापूर्वी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना बालनिरीक्षण गृहात पाठविण्यात आले असून, उर्वरित दोन मुलांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिलेच्या विनयभंगाशी संबंधित कलमाचीही वाढ करण्यात आली आहे.

Mumbai Kurla viral video
Operation Tiger: शिंदेंच्या बैठकीला ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांची हजेरी

तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा झाल्याचे या घटनेत प्रथमदर्शनी दिसत असल्याने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना नोटीस बजावून घटनेच्या वेळी उद्यानातील सुरक्षा व्यवस्था काय होती? याबाबत तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक उद्याने आणि मॉल परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.