Harbour line megablock | मेगाब्लॉक : हार्बरवरील लोकलसेवा उद्या साडेपाच तास बंद

विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्ती कामांसाठी मेगाब्लॉक
Harbour line megablock
मेगाब्लॉक : हार्बरवरील लोकलसेवा उद्या साडेपाच तास बंद pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्ती कामांसाठी रविवारी 1 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान लोकल सेवा सुमारे साडेपाच तास बंद ठेवण्यात आली आहे.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप व डाऊन सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 10.17 ते 15.47 दरम्यान सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Harbour line megablock
Mahayuti group registration : महायुतीची सोमवारी गट नोंदणी, पुढील दहा दिवसांत महापौर निवडणूक

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला तसेच पनवेल ते वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6.00 या वेळेत ठाणे ते वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Harbour line megablock
Thane district municipal mayor : ठाण्यातील पाच महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर

मध्य रेल्वे

  • ठाणे ते कल्याण अप व डाऊन जलद मार्ग

  • सकाळी 10.40 ते 15.40 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद व अर्ध-जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील. कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद, अर्ध-जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणेदरम्यान अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

  • चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

  • सकाळी 10.35 ते दुपारी 3.35

  • जलद मार्गावरील लोकल सेवा पाच तास बंद असेल. जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून धावतील, तर काही लोकलची सेवा दादर व वांद्रे येथे समाप्त हाईल.

मरेवर 85 दिवसांचा पॉवर ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून, यासाठी मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत 85 दिवसांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 16 व 17 वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून काम पूर्ण होऊन फलाट वाहतुकीसाठी सुपूर्द होईपर्यंत फलाट क्रमांक 16 व 17 वरून गाड्यांची वाहतूक पूर्णतः बंद राहील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news