Mahayuti group registration : महायुतीची सोमवारी गट नोंदणी, पुढील दहा दिवसांत महापौर निवडणूक

गटाच्या नोंदणीनंतर मुंबई महापालिका सचिव विभागात येऊन प्रत्येक नगरसेवकाला आपल्या वैयक्तिक माहितीचा अर्ज भरावा लागणार
Mahayuti group registration
महायुतीची सोमवारी गट नोंदणी, पुढील दहा दिवसांत महापौर निवडणूक(File Photo)
Published on
Updated on

मुंबई :भाजपा-शिवसेना महायुतीच्या नगरसेवकांची गट नोंदणी सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या गट नोंदणीमुळे मुंबई महानगरपालिकेची रखडलेली महापौर व उपमहापौर निवडणूक पुढील दहा दिवसांत घेणे पालिका प्रशासनाला शक्य होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे भाजपा-शिवसेना महायुतीच्या गट नोंदणीची चर्चा थांबली होती. शनिवार व रविवारी चर्चा करून गट नोंदणीचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारी कोकण आयुक्तांकडे गटाची नोंदणी करून, याची माहिती त्याच दिवशी मुंबई महापालिका सचिव विभागाला कळवली जाणार आहे. गटाच्या नोंदणीनंतर मुंबई महापालिका सचिव विभागात येऊन प्रत्येक नगरसेवकाला आपल्या वैयक्तिक माहितीचा अर्ज भरावा लागणार आहे

Mahayuti group registration
Marathi leader in AIMIM BMC : मुंबई पालिकेत एमआयएमचा गटनेता मराठी माणूस

हा अर्ज भरल्यानंतर मुंबई महापालिका सचिव विभागामार्फत महापालिका आयुक्तांची चर्चा करून महापौर व उपमहापौर निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. मात्र ही तारीख निश्चित करताना महापालिका प्रशासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे.

Mahayuti group registration
Matheran alternative road : पर्यायी रस्त्याची माथेरानकरांना प्रतीक्षाच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news