Maratha Morcha: मराठा वादळ आझाद मैदानात, मुंबईत वाहतूक कोंडी; कुठे काय परिस्थिती?

Maratha Morcha Mumbai: मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी कुठे काय परिस्थिती आहे याचा घेतलेला आढावा
Mumbai Traffic
Mumbai TrafficPudhari
Published on
Updated on

Maratha Morcha Azad Maidan Mumbai traffic update

मुंबई : मराठा आरक्षणाबाबतच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला महामोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकला. सकाळी मनोज जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईत पोहोचले असून या मोर्चामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी 11.30 वाजेपर्यंत कुठे काय परिस्थिती आहे याचा घेतलेला आढावा...

Mumbai Traffic
Manoj Jarange Patil: 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2025; मनोज जरांगेंनी किती वेळा उपोषण केले?

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ भीषण कोंडी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली आहे. बेस्ट बस, टॅक्सीसह असंख्य वाहनं ट्राफिक जाममुळे खोळंबली आहेत. कुलाबा भागातही वाहतकूक कोंडी झाली असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक सोशल मीडियावर करत आहेत.

अटल सेतू आणि फ्री वेवर वाहनांच्या रांगा

मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने येत असल्याने अटल सेतू आणि फ्री वेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मानखूर्दमध्ये कोंडी

मानखूर्दमध्ये पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या अडवल्याने सकाळी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कोस्टल रोडही जाम

मुंबईतील कोस्टल रोड येथे ब्रीच कँडी एक्झिटजवळही वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून या मार्गावर 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणते रस्ते बंद? (आपत्कालीन वाहनांशिवाय)

पनवेल-सायन रोडव्ही. एन. पुरव रोडईस्टर्न फ्रीवेपी. डी’मेलो रोडवालचंद हिराचंद मार्गडॉ. दादाभाई नौरोजी रोडहजारीमल सोमानी रोड

मराठा मोर्चाचा मार्ग कोणता?

पनवेल-सायन रोड (वाशी जकात नाका) → माणखुर्द फ्लायओव्हर → माणखुर्द रेल्वे ब्रिज → पंजरापोल जंक्शन → ईस्टर्न फ्रीवे → ट्विन टनल → महुल गाव → भक्ती पार्क → वडाळा रॅम्प → शिवडी → रे रोड → मझगाव → ईस्टर्न फ्रीवे रॅम्प → पी. डी’मेलो रोड → कार्नाक बंडर → जीपीओ → सीएसटी → आझाद मैदान.

Mumbai Traffic
Manoj Jarange Patil : सरकारने गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही; जरांगेंच आझाद मैदानावर उपोषण सुरू

आवश्यकतेनुसार अतिरिक्त बंद रस्ते उदाहरणे:

घाटकोपर-माणखुर्द लिंक रोडअग्रवाल व्हिलेज रोडचेंबूर रस्तेगोवंडी स्टेशन रोडदेवनार व्हिलेज रोडशिवडी-चेंबूर लिंक रोड (आयमॅक्स ते शांती नगर नाला)रायचूर स्ट्रीट, सोलापूर स्ट्रीट, पुणे स्ट्रीट, कुर्ला स्ट्रीट, युसूफ मेहराली रोड, सुरत स्ट्रीट, अहमदाबाद स्ट्रीट, बाबूराव रोकडे मार्ग, महानगरपालिका मार्ग, एमजी रोड, हजारीमल सोमानी मार्ग, डीएन रोड, शहीद भगतसिंग मार्ग, इ.

पर्यायी मार्ग कोणते?

१. दक्षिण मुंबई → मध्य व पूर्व मुंबईजेजे ब्रिज → मोहम्मद अली रोड → एसव्हीपी रोड → डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड → रफी अहमद किडवई मार्ग.ऑपेरा हाऊस → नाना चौक → ताडदेव सर्कल → मुंबई सेंट्रल, इ.२. दक्षिण मुंबई → पश्चिम मुंबईनेताजी सुभाषचंद्र बोस रोड → वीर नरिमन रोड → पेडर रोड → वरळी सी लिंक → डब्ल्यूईएच.३. दक्षिण मुंबई → ठाणेजेजे ब्रिज → आंबेडकर रोड → एलबीएस रोड → रफी अहमद किडवई मार्ग.४. मुंबई → ठाणे / नवी मुंबईचुनाभट्टी बी manchunabhatti-BKC कनेक्टर, SCLR, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, जोगेश्वरी-विक्रोली लिंक रोड, मुलुंड-ऐरोली रोड मार्गे.५. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (दक्षिण दिशेने)एससीएलआर मार्गे दक्षिण आणि पश्चिम मुंबईकडे वळवले जाईल.

मोर्चाच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था

कार्नाक बंडर बीपीटी पार्किंग – ५०० गाड्याकल्याण स्ट्रीट – ६० गाड्यारायचूर स्ट्रीट – ६० गाड्याजुनी डोंगरी चौकी – ६० गाड्याकॉटन ग्रीन – २००० गाड्यामैलेट बंडर (RO-RO आत) – ५०० गाड्या (दोन स्लॉट)बे व्ह्यू लॉन – १६० गाड्याजे-प्लॉट पार्किंग – ३००० गाड्याफ्रीवेच्या खाली (MBPT रोड) – २००० गाड्यामाणखुर्द जकात नाका – ३०० अवजड वाहनेएकूण क्षमता: ~ ८,८४० वाहने

जनतेला आवाहन

नागरिकांना विनंती आहे की बंद रस्त्यांचा प्रवास किंवा पार्किंगसाठी वापर करू नये.हा आदेश २९ ऑगस्ट २०२५, सकाळी ६:०० वाजेपासून पुढील सूचनेपर्यंत लागू राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news